- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे. यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.मागीलवर्षी कमी पावसाने कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना धक्का बसला. कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी तरी वेळेवर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. परंतु जळगाव तालुक्यात तब्बल २५ दिवस पाऊस उशीरा आला. त्यामुळे शेतकºयांना जुनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी लागली. उशीरा पेरणी झाल्याने पीकेही अगदी लहान आहेत. त्यात गत दहा दिवसापासून पाऊस नसल्याने काही शेतातील पिके सुकु लागली आहे. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतातालुक्यात सर्व सर्कलमध्ये सारखा पाऊस नाही. आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. तर जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे. तर कपाशी पात्यावर येत आहे. या पृष्ठभुमीवर जर दोन-तीन दिवसात वरूणराजाची कृपा झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होवून शेतकरी हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.पावसाचे प्रमाण गत पाच वर्षापेक्षाही कमीमागीलवर्षी ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात सरासरी पाऊस ३५१ मिमी झाला होता. यावर्षी मात्र आजतागायत फक्त २६३.७० मिमी पाऊस झाला आहे. गत २०१६ मध्ये याच तारखेपर्यंत ४५६ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१५ मध्ये ७ आॅगस्टपर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली होती. सन २०१४ मध्ये याच तारखेपर्यंत कोटी ३६१ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१३ मध्ये पावसाचे सर्व रेकार्ड तोडत ७ आॅगस्टपर्यंत ९११ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ असा की मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तरी यावर्षी आजतागायत फक्त निम्मे पाऊस झाला आहे. या परिस्थितीवर कशी मात करावी, असा यक्ष प्रष्न शेतकºयांसमोर उभा आहे.
पावसाअभावी जळगाव जामोद तालुक्यातील ४२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:42 PM
जळगाव जामोद : गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे.
ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे.