अतवृष्टीमुळे पाईपलाईन गेली वाहून

By admin | Published: September 2, 2014 12:36 AM2014-09-02T00:36:53+5:302014-09-02T00:36:53+5:30

खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Due to the overwhelm the pipelines are gone | अतवृष्टीमुळे पाईपलाईन गेली वाहून

अतवृष्टीमुळे पाईपलाईन गेली वाहून

Next

खामगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिनीचा काही भाग वाहून गेल्यामुळे खामगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर आल्याने जलवाहिनी वाहून गेली आहे. सारोळा शिवारातील जलवाहिनी वाहून गेल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अतवृष्टीमुळे जलवाहिनीवरून १0-१५ फूट पाणी वाहत आहे. पावसाच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पाईप लाईन दुरूस्तीचे काम चांगलेच रखडत आहे. दरम्यान, आज सोमवारी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी सारोळा शिवारात जावून वाहून गेलेल्या पाईपलाईनची पाहणी करून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. खामगाववासियांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी तांदुळवाडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातुनही पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी तांदुळवाडी येथील उन्नई बंधार्‍याचीही पाहणी करून उपस्थिती अधिकार्‍यांना यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सुचना दिल्यात. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष वैभव डवरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ताठे, शाखा अभियंता वसीम, नगर परिषदचे पाणी पुरवठा उपअभियंता संजय मोकासरे, सुपरवायझर सुरजसिंग ठाकुर, जगदीश इंगळे यांच्यासह नगर परिषदेचे व प्राधिकरणचे दुरूस्ती पथकातील कर्मचारी उपस्थित होते (प्रतिनिधी)

Web Title: Due to the overwhelm the pipelines are gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.