पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले विहिरीत पडलेल्या महिलेस जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:36 PM2019-01-09T15:36:30+5:302019-01-09T15:36:47+5:30

खामगाव:  विहिरीत पडलेल्या एका महिलेस शिवाजी नगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. रात्रीची थंडी आणि विविध अडथर्ळ्यांची तमा न बाळगता शिवाजीनगर पोलिसांनी सामाजिक दायित्व निभविले.

Due to police alert, the woman life save who was drowning in the well! | पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले विहिरीत पडलेल्या महिलेस जीवदान!

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले विहिरीत पडलेल्या महिलेस जीवदान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:  विहिरीत पडलेल्या एका महिलेस शिवाजी नगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. रात्रीची थंडी आणि विविध अडथर्ळ्यांची तमा न बाळगता शिवाजीनगर पोलिसांनी सामाजिक दायित्व निभविले. या दायित्वाची तात्काळ दखल घेत, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शिवाजी नगर पोलिसांच्या बचाव पथकाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे.

शहराच्या मढी भागातील एक ६५ वर्षीय महिला रात्रीच्या वेळी विहिरीत पडली. एका पाईपचा आसरा घेत ही जीवाच्या आकांताने ओरडत होती.  दरम्यान,  शिवाजी नगर पोलिस म्हाडा कॉलनी भागातील आरोपीची शोध मोहिम राबवून परतत  होते. त्यावेळी या इसमाने पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे  निरिक्षक रविंद्र देशमुख घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच पथकाला पाचारण केले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर शर्थीच्या प्रयत्नाअंती प्रभावती प्रभाकर वानखडे (६५) रा. शिवाजी वेस  या वृध्द महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या महिलेस तीचा मुलगा सचिन प्रभाकर वानखडे याच्या ताब्यात देण्यात आले. या बचाव कार्यात शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मनोज सुरवाडे, एएसआय मुरलीधर बोरसे,  पोकॉ प्रदीप वानखडे, राम धामोडे, अरविंद घोडके, अनंत परतडे, विक्रम राठोड, त्रिशुल ठाकरे, मंगेश विल्हेकर, दीपक इंगळे, अनिल शिंदे, रविंद्र इंगळे यांनी सहभाग दिला.


 

दोन पोलिसांच्या हाताला इजा!

वृध्द महिलेला वाचविण्यासाठी विहिरीत दोराच्या साहाय्याने उतरलेल्या दोन पोलिस कर्मचाºयांच्या हाताला जबर इजा पोहोचली. मात्र, कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता हेकॉ. राजेंद्र मार्कंड आणि पोलिस कर्मचाºयांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले.

 

जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून पुरस्काराची घोषणा!

शिवाजी नगर पोलिसांच्या या धाडसी कामगिरीची माहिती मिळताच, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी  बचाव पथकाला रोख पारितोषिक जाहीर केले.  जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कौतुकाच्या थापेमुळे पोलिसांचे परिश्रम सार्थकी लागल्याची चर्चा आहे.

 

गुन्हेगार शोध मोहिम राबविल्यानंतर सकाळी ५ वाजता पोलिस स्टेशनला परतत असताना, एका इसमाने महिला विहीरीत पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर महिला जीवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बचाव पथकाच्या मदतीने महिलेस सुखरूप बाहेर काढण्यात आले.

- रविंद्र देशमुख, निरिक्षक, शिवाजी नगर पोलिस स्टेशन, खामगाव.

Web Title: Due to police alert, the woman life save who was drowning in the well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.