मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:19+5:302021-06-19T04:23:19+5:30
धाड परिसरात पावसाची हजेरी धाड : परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजेदरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. ...
धाड परिसरात पावसाची हजेरी
धाड : परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजेदरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. परंतु शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बुलडाणा तालुक्यातही १८ जून रोजी ७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कृषी केंद्र संचालकांचे नियोजन हुकले
लोणार : बियाणांच्या दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालकांवरही झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे बियाणे खरेदी करते वेळी दुकानदारांनाही विचार करावा लागत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ!
बुलडाणा : कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने अनेकांचा राेजगार गेला. मागील वर्षी पावसामुळे पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत आता बाजार सुरळीत सुरू झाला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर माेठ्या प्रमाणात वाढले आहेत.
फळबाग लागवडीतून समृद्धीचा मार्ग
बुलडाणा : पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीत आता बदल होत आहे. पारंपरिक पिकांना बगल देत परिसरातील शेतकरी पेरू व सीताफळ लागवडीकडे वळले आहेत. यामधून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते. होतकरू व कष्टकरी शेतकऱ्यांना या माध्यमातून समृद्धीचा मार्ग गवसल्याचे चित्र धाड परिसरात दिसून येते.
कोल्हापुरी बंधाऱ्यातील जलसाठ्यात वाढ
साखरखेर्डा : लघुपाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या खडक पूर्णा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यामध्ये पावसाने पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतीलाही फायदा होणार आहे. परिसरातील शेतीला पाणी मिळावे, या उदात्त हेतूने कोल्हापुरी बंधारे अडविले गेले.
आठवडी बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा
डोणगाव : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लाॅकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहे. आता अनलाॅकनंतर सर्व दुकाने सुरू झाली आहेत. मात्र आठवडी बाजाराला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.
टेन्ट, साउंड व्यावसायिकांची उपासमार
बुलडाणा : कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रम बंद होते. त्यामुळे टेन्ट, लाईटिंग, साउंड व्यावसायिकांची उपासमार झाली आहे. सर्व लग्न व इतर समारंभाचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे अनलॉकमध्येही या व्यावसायिकांना आता कार्यक्रम मिळणे अवघड आहे.
औद्योगिक सुरक्षेचा अभाव
बुलडाणा : कामगारांसह पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्योगांमध्ये आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून द्यावयाच्या सुविधा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उपलब्धच नाहीत. त्यामध्ये अग्निशमन दल, कामगारांसाठी रुग्णालय, पाेलीस चौकी अशा अनेक सुरक्षेच्या सुविधांचा अभाव आहे.
ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने आता ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी अनेक रुग्णालयांमध्ये सिलिंडर उपलब्ध नसल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती होती.