कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जळगावच्या व्यक्तीसोबत केला होता नांदुऱ्यातील ८ जणांनी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:23 PM2020-05-19T19:23:00+5:302020-05-19T19:24:11+5:30

पुणे ते  नांदुरा असा प्रवास केला होता, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

Eight people from Nanduraahad traveled with a person from Jalgaon who died due to corona | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जळगावच्या व्यक्तीसोबत केला होता नांदुऱ्यातील ८ जणांनी प्रवास

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जळगावच्या व्यक्तीसोबत केला होता नांदुऱ्यातील ८ जणांनी प्रवास

Next

लोकमत न्युज नेटवर्क 
नांदुरा: कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झालेल्या जळगाव जामोदच्या व्यक्तीसोबत नांदुरा शहरातील १, तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील ७  व मलकापुरच्या एकाने १६ मे रोजी  तो जळगावात आला त्यावेळी पुणे ते  नांदुरा असा प्रवास केला होता, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.   
जळगाव जामोद येथे पुण्याहून १६ मेरोजी आलेल्या आलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान खामगाव येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जळगाव शहरात आधीच चिंता वाढली होती. या व्यक्तीची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री पाहता तो एका खासगी वाहनाने आला होता. ज्या क्रुझर गाडीने आला,  त्यात नांदुरा शहरातिल १, तालुक्यातील  चांदुरबिस्वा येथील १ चालक व इतर सहा असे सात व  मलकापूर शहरातील एक व्यक्ती असल्याची माहिती समोर आली. मुळच्या चांदूरबिस्वा येथील काही लोकांनी पुण्यावरून गावाकडे येण्याकरिता एक क्रुझर गाडी केली होती. यामध्ये नांदुरा शहरातील एकाचा समावेश होता. मृतक व्यक्तीस वाघोली पुणे येथून लिफ्ट देऊन बसवून घेतले होते. नांदुरा  तालुक्यातील वडनेर भोलजी येथे उतरून ते  सर्व ७ व्यक्ती  आॅटोने चांदूरबिस्वा येथे पोहचले होते. व एक नांदुरा येथे उतरला तर मृतक जळगावपर्यंत पोहोचला होता. जळगाव प्रकरणात येथील मृत झालेल्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये संबधीत सात चांदुर बिस्वा येथील  व्यक्तींचे नाव आल्याने  व एक नांदुरा शहरातील असल्याने नांदुरा परिसरात  एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

८ व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटीन 
१८ मेरोजी संध्याकाळी प्रशासनाला माहिती मिळताच चांदुरबिस्वा येथील संपर्कात आलेल्या ७ व्यक्तींना व नांदुरा शहरातील त्या एकाला बुलडाणा येते पाठवले आहे. या प्रकरणाने नांदुरा, मलकापूर, जळगाव व नांदुरा तालुक्याताल जबर धक्का बसला आहे. संबधितांचे रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबतची माहिती चांदुरबिस्वा ग्रामपंचायत प्रशासनाला होताच  त्यांनी गावात सर्वत्र सर्वेक्षण व गावाचा निजंर्तुकीकरणाच्या कामाला प्रारंभ केला आहे. एकाच क्रूझर गाडीत  चालकांसह नऊ  एवढे व्यक्ती कसे आले, त्यांना  कुणी परवाना दिला, या सर्वांसोबतच त्या वाहनचालकांचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Eight people from Nanduraahad traveled with a person from Jalgaon who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.