महाविद्यालयांमध्ये स्थापन हाेणार निवडणूक साक्षरता मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:25 AM2021-07-28T11:25:32+5:302021-07-28T11:25:48+5:30
Electoral Literacy Boards will be established in colleges : राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भारत निवडणूक आयाेगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी, लाेकशाही विषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ . याविषयीचे शासनादेश २३ जुलै राेजी जारी करण्यात आला आहे़.
विद्यापीठाने आणि प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे. या मंडळासाठी नाेडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करावी. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सदस्य राहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्गातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमधून निवडलेली समिती या मंडळाचे कामकाज पाहणार आहे.