लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भारत निवडणूक आयाेगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी, लाेकशाही विषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ . याविषयीचे शासनादेश २३ जुलै राेजी जारी करण्यात आला आहे़. विद्यापीठाने आणि प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे. या मंडळासाठी नाेडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करावी. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सदस्य राहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्गातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमधून निवडलेली समिती या मंडळाचे कामकाज पाहणार आहे.
महाविद्यालयांमध्ये स्थापन हाेणार निवडणूक साक्षरता मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:25 AM