सवडद येथे दोन रोहित्र असून, एक रोहित्र आठ दिवसांपूर्वी जळाले. ते बदलून मिळावे, म्हणून सरपंचांनी साखरखेर्डा येथील महावितरणच्या उपकार्यालयात मागणी केली आहे. कनिष्ठ अभियंता कुनाल डोळे यांनी ते रोहित्र काढून दुरुस्तीकरिता बुलडाणा येथे पाठविले. तेथील अधिकाऱ्यांनी गावठाणचे रोहित्र असल्याने लगेच दुसरे रोहित्र द्यायला पाहिजे होते; परंतु ते न दिल्याने गाव अंधारात असून, पिठाच्या गिरण्या बंद आहेत. याची महावितरण विभागाने दखल घेऊन रोहित्र बसवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उपोषणाचा इशारा
गावठाण फिडरवरील रोहित्र नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता लाइनमन यांनी बुलडाणा येथे पाठविले; परंतु ते परत आले नाही. रोहित्र तत्काळ बसविले नाही, तर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच शिवाजी लहाने यांनी दिला आहे.