लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १00 टक्के विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १९२ गावात अभियान राबविण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हय़ातील २२ गावांतील दलित वसत्यांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आली असून, आता वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.राज्यातील ज्या गावात ८0 टक्यापेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावात १00 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून, यात बुलडाणा जिल्ह्यातील २२ गावांमध्ये जवळपास ५00 नवीन वीज जोडण्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरही घेण्यात येत असून, लाभार्थींना तत्काळ वीज जोडणी दिली जाईल. दरम्यान, ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे त्यांना थकबाकीची रक्कम भरली तरच योजनेचा लाभ घेता येईल. सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १00 टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे.
३0 एप्रिलपर्यंत अभियानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रधानमंत्री हर घर बिजली योजना’ अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. १४ एप्रिल ते ३0 एप्रिल या दरम्यान संपूर्ण राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. सोबतच शिबिरे घेण्यात येऊन जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यात येणार असून, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
या गावातील विद्युतीकरणाचे काम पूर्णबुलडाणा मंडळातील शेगाव उपविभागातील कालखेड, पाळोदी, तरोडा कसबा, नांदुरा उपविभागातील, पिंपळखुटा धांडे, दहीवाडी, मलकापूर उपविभागातील बहापुरा, खामगाव उपविभागातील पोराज, लोखंडा, पळशी खु., बोरी, आसा, मेहकर उपविभागातील थारबरडापूर, मारोती पेठ, उमरा, बुलडाणा उपविभागातील साखळी खु., चिकला, देऊळगाव उपविभागातील सावंगी टेकाडे, बोराखेडी, सिंदखेड उपविभागातील मोहाडी , गोरेगाव तर लोणार उपविभागातील राजेगाव सिद्धखेड, सोयानदेव या गावातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.