बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार संघटना आक्रमक झाली आहे़ येत्या ३१ मे पर्यंत पिक विमा न दिलयास मंत्रालयासामाेर बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा एल्गार संघटनेचे प्रेसनजित पाटील यांनी दिला आहे़ या संबधीचे निवेदन एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे़
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पिक विम्याकरीता गत आठ महिन्यांपासून संघर्ष करीत आहाेत़ तहसिलदार, कृषी विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री ना़ दादाजी भुसे, ते मुख्यमत्र्यापर्यंत पत्र पाठवून विमा देण्याची मागणी केली आहे़ ४ फेब्रुवारी २०२१ राेजी ९० हजार शेतकरी रस्त्यावर उतरुन शेतकरी खुट मोर्चा उपविभागीय कार्यालय जळगांव जामोद येथे काढला हाेता़ ना १३ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेमफाम (सुचनापत्र) भरुन दिले़ तरी सुद्धा सन २०२० च्या खराप हंगामाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही़ काेविड महामारीमुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ त्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले़ त्यामुळे, येत्या ३० मे पर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक विमा न मिळल्यास मुंबई मंत्रालयासमोरोल महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ३१ मे पासुन बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे़ या निवेदनावर एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेसनजीत पाटील, विजय पाेहनकर यांची स्वाक्षरी आहे़