बुलडाणा जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीत धान्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 03:05 PM2019-08-09T15:05:46+5:302019-08-09T15:06:01+5:30
निराधार होणाºया कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
बुलडाणा : अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास निराधार होणाऱ्या कुटूंबाना प्रति कुटूंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तहसीलस्तरावर धान्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आल्या आहे; आपत्ती काळात धान्य वेळेवर पुरवठा होईल, असे नियोजनही करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व पुराचा फटका बसत आहे. तर काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस लागून बसलेला आहे. गेल्या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यातही २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गत दोन दिवसामध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक छोट्या-मोठ्या नद्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. अतिवृष्टी व पुराचा धोका पाहता, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने खबरदारीचे पाऊच उचलले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याचे निर्देश राज्यभरातील जिल्हा पुरवठा कार्यालयांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून तहसीलस्तरावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालिन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास, त्यामुळे निराधार होणाºया कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतरच ही मदत दिली जाणार आहे.