सिद्धार्थ आराख /बुलडाणा : उच्च शिक्षणात इंग्रजी भाषेचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. इतरांबरोबर आदिवासी विद्यार्थीसुद्धा उच्च शिक्षणात मागे पडू नये, त्यांनाही इंग्रजी शिक्षणाचे धडे घेता यावेत यासाठी तत्कालीन राज्य शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यात या योजनेंतर्गत ५00 विद्यार्थी इंग्रजीचे धडे घेत आहेत. आदिवासी विकास विभागाच्या २८ ऑगस्ट २00९ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या २५00 विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण दिल्या जाते. आदिवासींच्या मुलांचा इंग्रजीचा मूळ पाया भक्क म व्हावा व तोही जगाच्या बोली भाषेत इतरांच्या बरोबरीने असावा त्यासाठी आदिवासींच्या मुलांना पहिलीपासून ते बारावीपर्यंत इंग्रजीचे शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर येथील नामांकित इंग्रजी शाळेत ५00 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर यावर्षी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, चार शाळांचे प्रस्ताव आले आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे
By admin | Published: May 18, 2015 1:53 AM