समाजकार्याची उमेद प्रत्येकाने जागवावी - संतोष बारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:20+5:302021-01-08T05:52:20+5:30
खामगाव मार्गावरील दिव्या फाउंडेशनच्या दिव्यसेवा प्रकल्पाच्या कार्यक्रमाप्रसंगी रविवारी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विजयराज शिंदे, भारत कुळकर्णी, ...
खामगाव मार्गावरील दिव्या फाउंडेशनच्या दिव्यसेवा प्रकल्पाच्या कार्यक्रमाप्रसंगी रविवारी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला विजयराज शिंदे, भारत कुळकर्णी, डॉ. सुकेश झंवर, जयश्री रॉय, ॲड. जयश्री शेळके, विजयनाना परिहार आदींची उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते दिव्यसेवा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दिव्या फाउंडेशनने निराधार, मनोरुग्णांच्या सेवाकार्याला जोपासत वाटचाल करावी, कुणाच्या निंदेकडे लक्ष देऊ नये, समाजाप्रति संवेदनक्षम सेवाव्रतींच्या निरलस कार्याची समाज दखल घेत असतो. दिव्या फाउंडेशनच्या कार्याला मिळणारा प्रतिसाद हा सर्वांचीच उमेद वाढविणारा आहे, असे मत माजी आ. विजयराज शिंदे यांनी व्यक्त केले.
समाजात वावरताना दुर्लक्षित घटकांसाठी झटणे महत्त्वाचे आहे. दुर्बलांसाठी तनमनधनाने मदतीची साथ मिळतेच. त्यामुळे सामाजिक कामांची परंपरा अधिक वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रा. सिद्धार्थ पैठणे, ॲड. वर्षा पालकर, राकेश गायकवाड, दिव्या फाउंडेशनचे चिफ डायरेक्टर आशिष खडसे, अशोक काकडे, नगरसेवक मंदार बाहेकर, कोकिळा तोमर, रामदास डोंगरदिवे, शैलेश खेडकर, नीलेश शिंदे, प्रशांत जाधव, सुनील तिजारे, अजय दारखे, मिलिंद चिंचोळकर, योगेश सिंगरकर, सविता सुनवणे, गुंजन खडसे, अपर्णा सिंगरकर, राजू देशमुख, ज्योती गवई, अमोल खडसे, राजू टिकार, संगीता चापले, सुभाष रणदिवे, जीवन मुपडे, मोहम्मद इमरान, गजानन अवसरमोल आदी उपस्थित होते.
निराधारांची सेवा करण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात
निराधारांची सेवा करण्यासाठी सतत पुढाकार घेण्याऱ्या दिव्या फाउंडेशनच्या कामाला हातभार लावण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला. ललिता खडसे यांनी त्यांची कन्या मोनालीताई खडसे यांच्या स्मरणार्थ दिव्यसेवा प्रकल्पाच्या स्वयंपाकगृहाच्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी स्वीकारली आहे. अनेक दातृत्वाचे हात समोर आल्याची माहिती दिव्या फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी दिली.