महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 04:52 PM2019-06-13T16:52:33+5:302019-06-13T16:52:45+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.

Examination of Maharashtra Public Service Commission on June 16 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

Next

बुलडाणा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याती सुमारे २ हजार ५९२ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०१९ रविवार, १७ जुन रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एका सत्रामध्ये होणार आहे. परीक्षेसाठी बुलडाणा येथील सात परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात ५०४ परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३६०, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, सहकार विद्या मंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ४५६,  रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात २१६, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ४५६ परीक्षार्थी व पंकज लद्धड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंट स्टडीज चिखली रोड येथील परीक्षात केंद्रात २६४ परीक्षार्थी परीक्षेस बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशाप्रकारे एकूण सात परीक्षा केंद्रात १०८ खोल्यांच्या माध्यमातून २ हजार ५९२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी १० वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन/पेन्सील, ओळखीचे दोन पुरावे व त्याच्या छायांकित प्रती आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजिटल डायरी, अन्य दूरसंचार साधने, बॅग्ज आदी आक्षेपार्ह वस्तू, साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एका ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी, अशा सुचना केंद्र प्रमुख तथा आरडीसी राजेश पारनाईक यांनी दिल्या आहेत.
 
परीक्षेची जबाबदारी २१० अधिकारी, कर्मचा-यांवर
या परीक्षेचे कामकाज पाहण्यासाठी एकूण २१० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.  परीक्षेकरीता एक भरारी पथक प्रमुख, दोन समन्वय अधिकारी, सात उपकेंद्रप्रमुख, ३७ पर्यवेक्षक, १२५ समवेक्षक, १४ परीक्षा लिपीक, २४ चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा एकूण २१० अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: Examination of Maharashtra Public Service Commission on June 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.