कोरोना प्रतिबंधासाठी शक्ती खर्ची घाला- जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:31+5:302021-04-21T04:34:31+5:30
सध्याची वेळ ही लढाईची नाही. तर सार्वत्रिक स्वरूपात एकत्र येऊन कोरोना विरोधात लढा पुकारण्याची आहे. त्यासाठी आपली शक्ती खर्च ...
सध्याची वेळ ही लढाईची नाही. तर सार्वत्रिक स्वरूपात एकत्र येऊन कोरोना विरोधात लढा पुकारण्याची आहे. त्यासाठी आपली शक्ती खर्च करावी. त्यादृष्टीनेच शिवसेना सध्या प्रयत्नरत असून उपाययोजना करत आहे. सामान्य माणसाला कशी मदत मिळले, त्याची अडचण कशी दूर होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २४ तास आमचे भ्रमणध्वनी सुरू आहेत.
दरम्यान, भाजप-शिवसेनेमधील तणावाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता आमच्यासाठीही हा विषय संपला आहे. भावनेच्या भरात एखाद वेळेस बोलताना तोल जाऊ शकतो. तो न जाऊ न देता तोलून मापून शब्द वापरणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कोणाचे मन दुखणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र प्रसंगी त्रागामुळे असे शब्द येणे साहजीक आहे. त्याचा बाऊ न करता त्यामागील भावना बघणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी सामुहिकस्तावर आता एकत्र येऊन हा लढा यशस्वी करण्याची अवश्यकता असल्याचे खा. जाधव म्हणाले.
--भांडणातून जिल्ह्याचे भले होणार नाही- गायकवाड--
जिल्ह्यात सध्या जे काही चाललेल आहे. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिस प्रशासनावरही ताण येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार झाला आहे. अशा भांडणातून जिल्ह्याचे भले होणार नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट त्यांनी सकाळी घेतल्यानंतर ही भावना त्यांनी व्यक्त केली.