लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सुंदर शहर-स्वच्छ शहर, पर्यावरण संतुलनासाठी लोकसेवा शिक्षण मंडळाने घेतलेल्या संकल्पास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्याच अधिपत्याखालील शिक्षक सरसावले आहेत. त्यात मलकापुरातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापुरात प्रथमच अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे उचलण्यात आलेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर परिसरात के.जी.टू.पी.जी. अशी शैक्षणिक प्रगती केल्यानंतर लोकसेवा शिक्षण मंडळाने पद्मश्री डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकीची सुरुवात करून माइल स्टोन गाठला. मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्यांच्या अधिपत्याखालील संस्थेच्या शिक्षकांनी शाळेत येताना सायकलने यावे, असा संकल्प ठेवला. आठवड्यातून किमान बुधवारी एक दिवस तसे करण्याबाबत विनंतीवजा सूचना त्यांनी केल्या. त्यास तत्काळ मान्य करीत नूतन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याची संकल्पना मान्य करून प्रत्यक्ष अमलात आणण्यास सुरुवात केलीे. त्यासाठी शिक्षकांनी मोटारसायकल न वापरता शाळेत सायकल आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, शिक्षिकांनीदेखील त्यात कमी न पडता पुढाकार घेऊन सायकलने किंवा पायी शाळेत येण्यास सुरुवात केली.-
मलकापूरातील शिक्षक सायकलने येणार शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:10 AM
मलकापुरातील शिक्षकांनी सायकलने शाळेत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापुरात प्रथमच अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीचे उचलण्यात आलेले पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
ठळक मुद्देपर्यावरण संतुलनासाठी आगळेवेगळे पाऊललोकमत प्रेरणावाट