शेतकर्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:15 AM2017-11-08T00:15:25+5:302017-11-08T00:16:03+5:30
चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस, उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस, उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदत आहे, यापासून शेतकर्यांचे लक्ष विचलित करण्यासाठीच बाजार समितीकडे शेतकर्यांच्या निवास व नाममात्र दरात भोजनाची मागणी करण्याचा पुळका श्वेता महाले दाखवित असून, त्यांनी बाजार समितीवर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान बाजार समिती सभापती, उपसभापतींसह संचालकांनी दिले आहे.
श्वेता महाले यांनी केलेली मागणी व बाजार समिती प्रशासनावर केलेल्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर बाजार समिती संचालकांनी ६ नोव्हेंबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाले यांना हे आवाहन केले आहे. यानुषंगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शे तकर्यांना निवास व नाममात्र दरात भोजन देण्याबाबत यापूर्वी पासून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून समिती प्रशासन प्रयत्नशील आहे व य थावकाश त्याबाबत कारवाई ही होणारच आहे.
मात्र, तत्पूर्वी शेतकर्यांना समितीतील निवास व भोजनाऐवजी सर्व कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आपल्या शेतमालाला योग्य भाव हवा आहे.
तो सरकारने द्यावा जेणेकरून, जगाला पोसणार्या शेतकर्याला अशा नाममात्र दरातील भोजनाची गरज भासणार नाही आणि यासाठी श्वेता महाले यांनी त्यांचे वजन सरकार दरबारी वापरावे व तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यासोबतच, शेतकर्यांप्रती पुळका दर्शविणार्या व बाजार समिती राजकारण व भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचा आरोप करणार्या महाले यांनी भाजपाची राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने या सत्तेचा सदुपयोग घेऊन समितीत भ्रष्टाचार उघडीस आणावा. भ्रष्ट पदाधिकारी व संचालकांवर कारवाई करून बाजार समिती बरखास्त करावी, केवळ प्रसिद्धी माध्यमांत सवंग प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करू नयेत, वास् तवात भाजपाच शेतकर्यांप्रती खोटा कळवळा दाखवित असून, शेतमालाला अशाच प्रकारे कमी भाव देत राहिलात तर खरोखरच शेतकर्यांना स्वत:चे घरदार विकून देशोधडीला लागावे लागणार आणि त्यांना निवास व नाममात्र दरातील भोजनाची गरज भासणार असल्याची बहुधा महाले यांना जाणीव झाली असल्यानेच त्यांनी ही मागणी केली असावी, अशी उपरोधीत टीकादेखील बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उ पसभापती ज्ञानेश्वर सुरूशे, संचालक विष्णू पाटील, सचिन शिंगणे, संजय गाडेकर, विजय शेजोळ, रूपराव सावळे, अशोक मगर, राजू जावळे, सुमन म्हस्के, पुष्पा पडघान, ईश्वर इंगळे, गजानन मोरे, दीपक जाधव, गजानन पवार, मनोज खेडेकर आदी संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.