टाकरखेड हेलगा येथे शेतकरी शेतीशाळा कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:04+5:302021-02-14T04:32:04+5:30
डाॅ.पं.दे.कृषी विघापीठ अकाेला व कृषी विभाग बुलडाणा यांचे निर्देशावरून जे विकते तेच पिकवा या प्रमाणे आयसीआर नवी दिल्ली कडून ...
डाॅ.पं.दे.कृषी विघापीठ अकाेला व कृषी विभाग बुलडाणा यांचे निर्देशावरून जे विकते तेच पिकवा या प्रमाणे आयसीआर नवी दिल्ली कडून मिळालेला पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विघापीठाचे आदर्श शेतकरी टाकरखेड हेलगा येथील प्रगतीशिल शेतकरी पंढरीअप्पा गुंजकर हे संपुर्ण शेती सेंद्रीय पध्दतीने करीत असून यावेळेस त्यांनी राहुरी कृषी विघापीठाचे करडीचे वान ७०८ हे पेरले असून पिक चांगले बहरल आहे. अकाेला येथील डाॅ.पं.दे.कृ.वि.चे शास्त्रज्ञ डाॅ.विनाेदराव खडसे, राठाेड, बुलडाणा जि.कृ.अधिकारी नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी डाबरे, तालुका कृषी अधिकारी शिंदेसर आदी उपस्थित हाेते. करडी पिक शेतकऱ्यांना आजच्या काळात पुरण्याजाेगे आहे. तेलवाण आहे. कमी खर्चाचे पीक आहे. काेणत्याही वन्य पशुपासून त्रास नाही. फक्त पाेपटापासून बचाव करावा लागताे. पुर्वी करडीचे पिक खुप हाेत हाेते परंतु १९९७ पासून बंद झालेले आहे. आता हे पिक निश्चीतपणे येते करीता शेतकऱ्यांनी पेरावे, असे आवाहन गुंजकर यांनी केले आहे. सदर सेंद्रीय पध्दतीने पेरलेल्या करडी शेतास करवंड डासाळा सह परिसरातील शेतकरी बांधव भेटी देवून माहीती जाणून घेत आहेत.