- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. या धर्तीवर राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी शनिवारी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. यावरून खामगाव व परिसरात शेतकरी संघटना आक्रमक तर शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.एकीकडे आधीच गत तीन ते चार वर्षांपासून शेतकरी कोरड्या दुष्काळाला सामोरा जात असताना, यावर्षी ओल्या दुष्काळानंतरही शेतकºयांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी संपुर्ण खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला आहे. मोजके शेतकरी सोडले, तर मुगाचे पिकही शेतकºयांच्या हाती लागले नाही. त्यानंतर उडीद, ज्वारी, सोयाबीन, मका ही पिके पावसामुळे अक्षरश: सडली. कपाशी जरी सध्या शेतात उभी दिसत असली, तरी पावसामुळे सुरूवातीच्या बहरातील बोंडे सडल्याने उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच बाजारभाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले. दरम्यान पावसामुळे झालेली परिस्थिती पाहता, शासनाने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे पुर्ण झाले आणि शनिवारी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर केली. या मदतीवरून शेतकरी संघटनांसह शेतकरीही चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या तर कोणतेही पंचनामे न करता शेतकºयांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये मदत तसेच शेतकºयांच्या पाल्यांची केवळ परीक्षा फी नव्हे तर शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु जाहीर करण्यात आलेली मदत अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकºयांकडूनही खंत व्यक्त करण्यात येत आहे.
परीक्षा शुल्क नव्हे शैक्षणिक शुल्क माफ करा!शनिवारी राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. परंतु केवळ परीक्षा शुल्क नको, तर शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. परीक्षा शुल्काची रक्कम फार मोठी नसून शेतकरी ती भरू शकेलही, मात्र शैक्षणिक शुल्काची रक्कम प्रचंड असल्याने यात शेतकºयांना दिलासा मिळायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे जाहीर झालेल्या मदतीवरून आक्रोश पाहायला मिळत आहे.
शेतकºयांना जाहीर झालेली हेक्टरी ८ हजार रूपयांची मदत म्हणजे निव्वळ थट्टाच आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाकिाºयांच्या बैठका सुरू असून लवकरच मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातून सुमारे १० हजार शेतकरी सहभागी होतील.प्रशांत डिक्करजिल्हाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा आघाडी
हेक्टरी ८ हजार रूपयात पेरणीचा खर्चही निघू शकत नाही. अशा अवस्थेत वर्षभर उदर्निर्वाह, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न कसा सोडवायचा, याचा विचार मदत जाहीर करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे आंदोलन हाच एकमेव मार्ग आहे.रमेश बाणाईतजिल्हाध्यक्ष, रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना
शेतकºयांचे दु:ख काय असते, हे राज्यपालांना काय कळणार? ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या राजकारण्यांनीच शेतकºयांच्या संकटाच्या काळात सत्तेचा खेळ मांडला; त्यामुळे शेतकरी अलगद बाजूला फेकल्या गेला. हेही दिवस निघून जातील. येणारा काळच प्रत्येकाला ज्याची-त्याची जागा दाखवेल.संतोष कुकडे, शेतकरी सोनाळा