शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:24 PM2021-10-18T19:24:56+5:302021-10-18T19:25:28+5:30

Crop insurance : दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.

The farmers returns the crop insurance amount back to the CM | शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

Next

जळगाव जामोद :   तालुक्यातील एका मंडळांमध्ये सन २०१९-२० ची पिक विम्याची रक्कम एकरी बारा हजार या प्रमाणे मिळाली असतांना इतर चार मंडळांमध्ये मात्र हीच रक्कम विमा कंपनीकडून एकरी ५०० ते १५०० याप्रमाणे वितरित केली जात आहे.या पृष्ठभूमीवर दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
          सन २०१९-२० च्या पिक विम्याची रक्कम मोठा संघर्ष केल्यानंतर पिक विमा कंपनीने मंजूर केली.परंतु त्याचे वाटप करताना मंडळनिहाय मोठी तफावत ठेवली आहे.तालुक्यातील एका मंडळात एकरी बारा हजार प्रमाणे वितरण होत असताना अन्य चार मंडळात मात्र एकरी ५०० ते १५०० प्रमाणे वितरण सुरू आहे.या असमानतेचा संताप म्हणून मुरलीधर पुंडलिक राऊत व संतोष राजाराम दांडगे या दोन शेतकऱ्यांनी पीक विम्याची मिळालेली रक्कम तहसीलदार शीतल सोलाट यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना दिवाळी साजरी करण्यासाठी परत केली आहे.तशा आशयाचे निवेदन व चेक या दोन शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांना दिले.किमान या घटनेनंतर तरी शासनाकडून या बाबीची गंभीर गंभीर दखल घेत इतर मंडळांमध्ये पीक विम्याची रक्कम वाढवून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

Web Title: The farmers returns the crop insurance amount back to the CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.