शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक

By विवेक चांदुरकर | Published: December 23, 2023 02:01 PM2023-12-23T14:01:43+5:302023-12-23T14:01:54+5:30

कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांच्यासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजपूरवठा खंडीत होत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याबाबत माहिती दिली.

Farmers strike at the Maha distribution company office | शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक

शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या कार्यालयात धडक

मलकापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी नाहक त्रास देत असुन त्यांच्या दिरंगाईमुळे शेतातील उभी असलेली पिके उघड्या डोळ्यांदेखत सुकुन जात आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांनी महावितरणे कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक दिली.

कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांच्यासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजपूरवठा खंडीत होत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याबाबत माहिती दिली. शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भुमिका घेतली. जळगाव जामोद येथील हरी ओम नगरातील विद्युत कनेक्शनची समस्या, धरणगाव येथील घरातील विद्युत पोल काढणे, मलकापूर शहरातील आदर्श नगर येथील उभ्या असलेल्या विद्युत पोलवर तार ओढणे, वडोदा (पान्हेरा) येथील रोहीत्र, काळीपुरा येथील रोहीत्र, धानोरा येथील कान्हु पाटील शेतातील रोहीत्र नादुरूस्त असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली. त्यातील वडोदा (पान्हेरा) येथील तुटलेली तार जोडल्याने त्यावरील पंधरा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळाले, हरिओम नगर जळगाव जामोद येथील घरगुती मिटर तत्काळ बसविण्याचे आश्वासन तसेच आदर्श नगर व मुक्ताईनगरातील उभ्या असलेल्या विद्युत पोलवर तार ओढण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंग राजपूत, तालुका प्रमुख दिपक चांभारे, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, रामराव तळेकर, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान भाई लकी, सत्तार शाह, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, दीपकसिंग राजपूत, जावेद खान, वसीम खान, सतार चव्हाण, विजय सपकाळ, माजिद खान, गणेश वायडे, शिवा रायपुरे, शेख अफजल, जावेद खान, प्रकाश सातव, उमेश कदम, किसनराव गायकवाड, शांताराम काटकर, दीपक सरोदे, विठ्ठल गायकवाड, विठ्ठल कवरे, सत्तार शहा यांच्यासह शिवसैनिक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmers strike at the Maha distribution company office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.