रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:04+5:302021-05-22T04:32:04+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो, हा दर वेळेसचा अनुभव पाहता मृग नक्षत्रात कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, ...
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो, हा दर वेळेसचा अनुभव पाहता मृग नक्षत्रात कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची लागवड करण्यात येते. या नक्षत्रात लागवड केलेल्या पिकांचा उतारा चांगला येताे. म्हणून शेतकरी विविध पातळीवर कामाला लागले आहेत. त्याचबरोबर पिकांना पाण्याबरोबर गरज असते ती बूस्टर डोस देण्यासाठी रासायनिक खतांची. शेती कामाबरोबर रासायनिक खतांचीदेखील चाचपणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण गरजेच्या वेळी जास्तीचे पैसे देऊनही शेतकऱ्यांना खत मिळत नाही. त्यात सध्या सोशल मीडियावर रासायनिक खतांच्या भाववाढीचे पत्रक पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. तसेच काही व्यापाऱ्यांनी या पत्रकाच्या आधारेच भाव वाढविले आहेत.
काेट
केंद्र शासनाकडून रासायनिक खतांच्या भाववाढीचे पत्रक कोणत्याही दुकानदाराकडे किंवा कृषी विभागाकडे नसल्याने जुन्या दरानुसार खताची विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, हे नवीन दरपत्रक आलेच कसे, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला. काही कृषी चालक हे शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी.
दिलीपराव नामदेव शिणकर, पं. स. सदस्य, बुलडाणा
काेराेनाच्या भीषण संकटातही शेतकरी खंबीर उभा राहून काळ्याआईची सेवा करीत आहे. कोरोना महामारीने आधीच शेतकरी दीड वर्षापासून त्रस्त झाले आहेत. याची दक्षता कृषी विभाग व कृषी केंद्रातील व्यापाऱ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, शेतकरी
शासनाचे नवीन परिपत्रक २० मे २०२१ रोजी प्राप्त झाले आहे. त्यामध्ये जास्त दरवाढ नाही. जर कृषी सेवा केंद्र संचालक जास्त दराने खत विक्री करीत असेल तर कृषी विभागाशी संपर्क करावा. कृषी विभागात माहिती प्राप्त झाल्यास जास्त दराने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र संचालकावर त्वरित कारवाई करण्यात येईल.
मिरज तालुका कृषी अधिकारी, बुलढाणा