विषारी द्रव्य घेऊन शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:14 AM2017-08-09T01:14:08+5:302017-08-09T01:14:56+5:30
लोणार : कर्ज, वाढती महागाई यामुळे तालुक्यातील वझर आघाव येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर जगन आघाव यांनी ७ ऑगस्ट रोजी २ वाजताच्या दरम्यान शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : कर्ज, वाढती महागाई यामुळे तालुक्यातील वझर आघाव येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर जगन आघाव यांनी ७ ऑगस्ट रोजी २ वाजताच्या दरम्यान शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केली.
तालुक्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. प्रशासनाला मात्र अजून जाग आलेली नाही. रामेश्वर आघाव यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते. गत तीन वर्षांपासून सातत्याने त्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आघाव कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
साखरखेर्डा : येथील वार्ड क्र. ६ मधील रहिवाशी अनिल देवकर या युवकाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. उपरोक्त घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री घडली.
अनिल रंगनाथ देवकर वय ३४ वर्ष हा युवक गावात पाणी विक्रीचा व्यवसाय करीत होता. नागपंचमीनिमित्त पत्नी माहेरी गेलेली असल्याने तो एकटाच घरी होता. ७ ऑगस्टला सायंकाळी तो घरी गेला आणि रात्रीच्या सुमारास रुमाल आडव्या बल्लीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याचे वडील त्याच्या राहत्या घरी गेले असता, दरवाजा उघडला तर अनिल हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशनमध्ये राजू रंगनाथ देवकर यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन र्मग दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक राणे, पोहेकॉं अरविंद चव्हाण करीत आहेत.