हरभरा व तूर खरेदीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:17 PM2018-08-06T16:17:24+5:302018-08-06T16:18:44+5:30
मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. ६ आॅगस्ट रोजी अनेक शेतकरीमेहकर येथील खरेदी विक्री संघ कार्यालयावर धडकले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी मध्यस्थी करून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना शांत केले. मागील वर्षी मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांना हरभरा व तूर पिकांचे चांगले उत्पादन झाले होते. मात्र बाजारामध्ये तूर व पिकांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने मातीमोेल किंमतीने हरभरा व तूर विकावी लागली. या पिकांच्या भरोश्यावर शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होते. मात्र बाजारात भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. त्यामुळे शासनाने मेहकर तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करून शेतकºयांचे हरभरा व तूर हमी भावाने खरेदी केले होते. परंतु खरेदी केलेल्या हरभरा व तूर पिकांचे पैसे गेल्या चार ते पाच महिन्यापासून मेहकर तालुक्यातील अनेक शेतकºयांना मिळालेच नाही. पैसे मिळण्यासाठी शेतकरी दररोज खरेदी विक्री कार्यालय मेहकर व विविध बँकाकडे चकरा मारत आहेत. या पार्श्वभूमिवर ६ आॅगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी खरेदी विक्री कार्यालयावर धउकले होते. माल खरेदी करून चार ते पाच महिने होऊनही पैसे न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याच वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री कार्यालयाला भेट देवून शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या व वरिष्ठ अधिकाºयांशी मोबाईलद्वारे संपर्क करून शेतकºयांच्या व्यथा सांगितल्या. यावेळी लवकरात लवकर शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाºयांनी दिले. ही माहिती माधवराव जाधव यांनी शेतकºयांना दिल्याने त्यांचा रोष कमी झाला. यावेळी शेतकरी शुभम आसोले, श्रीराम वानखेडे, श्रीकृष्ण अवगळे, गजानन सुरूशे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
माल खरेदी करूनही नोंदणीच नाही
शासनाने नाफेड मार्फत मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयाचे तूर व हरभरा खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या मालाची नोंदणी होणे गरजेचे होते. मेहकर तालुक्यातील जवळपास ११५ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी करूनही या शेतकºयांच्या मालाची नोंदणी न झाल्याने त्या शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहे. शेतकरी दररोज संबंधित विभागाकडे चकरा मारतात. मात्र नोंदणीची वेबसाईटच बंद असल्याने जवळपास ११५ शेतकºयाची तुर व हरभरा पिकांची खरेदी करूनही नोंदणीच झालेली नाही. (तालुका प्रतिनिधी)