'फादर्स डे'लाच बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; शौचालयात पडलेला मोबाईल काढायला गेले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:33 PM2020-06-22T15:33:22+5:302020-06-22T15:40:18+5:30
गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांना जेसीबीने काढून नांदुरा येथे उपचाराकरिता भरती केले.
नांदुरा - तालुक्यातील निमगाव येथे निमगाव फाट्या रस्त्याने शौचालयात पडलेला मोबाईल काढण्याचा प्रयत्नात २१ जूनच्या सकाळी अकरा वाजे दरम्यान पितापुत्र शौचालयाच्या टाक्यात जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांना जेसीबीने काढून नांदुरा येथे उपचाराकरिता भरती केले मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने गावतील नागरिक शोकसागरात बुडाले आहे. ही घटना फादर्स डे दिवशी घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर अशी की, निमगाव येथील मधुकर नारायण टवलारकर (वय ५५) आणि त्यांचा मुलगा बंटी उर्फ अनिकेत मधुकर टवलारकर (वय २५) हे शौचालयात पडलेला मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात सरळ टाक्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. वेळेवर गावकऱ्यांनी धावून जेसीबी बोलावून त्यांना बाहेर काढले. व पुढील उपचारासाठी नांदुरा येथे पाठवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली