खामगाव : तालुक्यातील लाखनवाडा येथील ग्राम पंचायतमध्ये सरपंच पदाच्या राजीनाम्यावरुन वाद निर्माण होवून महिला सरपंचास बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.लाखनवाडाग्राम पंचायतमध्ये सोमवारी महिला सरपंच निर्मालाबाई समाधान देशमुख (४५) यांच्या राजीनाम्याच्या पडताळणीबाबत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. सदर सभेत वाद उद्भवण्याची भिती असल्याने अगोदर ग्रा.पं.मध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर बैठक बंद खोलीत सुरु असल्याने काही वेळानंतर सरपंच निर्मलाबाई देशमुख यांचा ग्रा.पं.च्या इतर सदस्यांसोबत राजीनाम्यावरुन शाब्दीक वाद झाला. सदर वादाचे पर्यावसन हाणामारीत होवून काही सदस्यांनी संगनमत करुन महिला सरपंच निर्मलाबाई देशमुख यांना काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. त्यांना तातडीने लाखनवाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करुन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
लाखनवाडा येथील महिला सरपंचास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:49 PM
खामगाव : तालुक्यातील लाखनवाडा येथील ग्राम पंचायतमध्ये सरपंच पदाच्या राजीनाम्यावरुन वाद निर्माण होवून महिला सरपंचास बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
ठळक मुद्देसरपंच निर्मालाबाई समाधान देशमुख (४५) यांच्या राजीनाम्याच्या पडताळणीबाबत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती.काही वेळानंतर सरपंच निर्मलाबाई देशमुख यांचा ग्रा.पं.च्या इतर सदस्यांसोबत राजीनाम्यावरुन शाब्दीक वाद झाला.काही सदस्यांनी संगनमत करुन महिला सरपंच निर्मलाबाई देशमुख यांना काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले.