पाचव्या दिवसांपर्यंत केवळ २२७ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:11 PM2017-09-26T22:11:06+5:302017-09-26T22:11:19+5:30

येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यासाठी प्रारंभ झाला आहे.

By the fifth day only 227 applications | पाचव्या दिवसांपर्यंत केवळ २२७ अर्ज

पाचव्या दिवसांपर्यंत केवळ २२७ अर्ज

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी केवळ ४७ तर सदस्यपदासाठी १८१ अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यासाठी प्रारंभ झाला आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे पाच दिवसात केवळ २२७ नामांकन अर्ज दाखल होऊ शकले. यात सरपंच पदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी १८० अर्जाचा समावेश आहे.
२९ सप्टेंबर ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या पाच दिवसात नामांकन झाल्याची आकडेवारी नगण्य आहे. मोहाडी तालुक्यात ५८ ग्रामपंचायत निवडणूक असताना सरपंचपदासाठी अद्याप एकही नामांकन झालेले नाही. पवनी तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीची निवडणूक असताना सरपंचपदासाठी केवळ एक तर लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी तीन, लाखनीत ५१ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी चार, भंडारा ३९ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी आठ जणांचे नामांकन दाखल झाले आहे.

Web Title: By the fifth day only 227 applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.