दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पाच लाखांचे अर्थसाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:48+5:302021-08-24T04:38:48+5:30

पावसाने पिकांचे नुकसान डोणगाव: लोणीगवळी, डोणगाव, शेलगाव देशमुख शिवारात पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेताची पाहणी ...

Five lakh financial assistance to children who have lost both parents | दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पाच लाखांचे अर्थसाह्य

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पाच लाखांचे अर्थसाह्य

googlenewsNext

पावसाने पिकांचे नुकसान

डोणगाव: लोणीगवळी, डोणगाव, शेलगाव देशमुख शिवारात पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेताची पाहणी आ. डॉ. संजय रायमुलकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर व मेहकरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी शुक्रवारी केली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

सहा हजार मतदारांची नावे वगळली

सिंदखेड राजा : रहिवासी पत्त्यावर राहात नसल्याने सिंदखेड राजा मतदारसंघातील ६ हजार ३९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार एकूण मतदार संख्या जिल्ह्यात २० लाख ५४ हजार ३८४ होती. त्यापैकी ५३ हजार २२५ मतदारांची छायाचित्रे उपलब्ध नव्हती. दरम्यान, छायाचित्रे जमा करण्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व मतदारांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते.

Web Title: Five lakh financial assistance to children who have lost both parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.