त्या जखमी वानराच्या मृत्यूनंतर वनविभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:54+5:302021-06-18T04:24:54+5:30
देऊळगाव राजा तालुक्यातील वनपरिक्षेत्र विभागअंतर्गत येणाऱ्या व अंढेरा बिटमधील नागणगाव येथे लिंबाची वाळलेली फांदी मोडल्याने वानर खाली कोसळल्याने ...
देऊळगाव राजा तालुक्यातील वनपरिक्षेत्र विभागअंतर्गत येणाऱ्या व अंढेरा बिटमधील नागणगाव येथे लिंबाची वाळलेली फांदी मोडल्याने वानर खाली कोसळल्याने त्यावर कुत्र्यांनी हल्ला चढविल्याची घटना ११ जून रोजी घडली होती. जखमी झालेल्या वानरास नागणगाव ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या तावडीतून वाचूवन त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. परंतु, जबाबदार अधिकारी घटनास्थळावर सकाळी माहिती मिळाल्यानंतरही फिरकले नसून वनरक्षक यांनी केवळ वनमजूर यांना पाठविले. वानर जखमी झाल्याने दुपारपर्यंत चवताळलेल्या अवस्थेत असल्याने वनमजूर दुपारी तीन वाजता घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत वनरक्षक यांनी घटनेकडे दुर्लक्षच केले. नागणगाव ग्रामस्थांनी वानरावर पहारा देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. परंतु, वनविभागाचे कर्मचारी यांना १५ तासानंतर घटनास्थळी दाखल होण्यास दुसऱ्यांदा माहिती द्यावी लागली. कर्मचारी घटनास्थळी न आल्याने जखमी वानराच्या उपचारासाठी विलंब झाला. त्यामुळे जखमी वानर मृत्युमुखी पडले. परंतु, मृत्यू प्रकरणात वनविभाग देऊळगाव राजा तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दोषींवर आठ दिवसांनंतरही कुठलीच कार्यवाही केलेली नाही. या प्रकरणात कार्यवाहीबाबत माहिती विचारली असता आम्ही आमच्या पातळीवर कारवाई केली, असल्याचे सांगितले.