बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; ९१६ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:38 AM2021-04-14T11:38:32+5:302021-04-14T11:38:39+5:30

Corona Cases : चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ९१६ जण कोरोनाबाधित निघाले आहेत.

Four killed in Buldana district; 916 positive | बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; ९१६ जण पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; ९१६ जण पॉझिटिव्ह

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ९१६ जण कोरोनाबाधित निघाले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे ५ हजार ८८० अहवाल तपासण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ९६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७५, रायपूर ३, पोखरी ३, पाडळी ४, उमाळा ४, सावळी ४, म्हसला ३, करडी ५, धाड ५, मोताळा १२, पिं. देवी ४, दाभाडी ११, पिं. गवळी ३, उबाळखेड ३, खामगाव ४९, राहुड ३, शेगाव ३९, लासुरा ३, खेर्डा ७, चिखली ४०, वाघापूर ४, शेलगाव आटोळ १२, अंत्री खेडेकर ४, चांधई ३, मलकापूर २,  काळेगाव ५, निंबारी ५, उमाळी ६, दे. राजा २७, दे. मही ३, खैरव ४, टाकरखेड भा. ४, सिं. राजा १७, दुसरबीड ३, बाळसमुद्र ३, वखारी ३, मेहकर ५१, हिवरा आश्रम ३, डोणगाव ६, लोणी गवळी ३, दे. माळी २४, जानेफळ ६, वरवट बकाल ६, जळगांव जामोद ११, वडगाव ३, वडगाव पाटण ५, आसलगाव ४, भेंडवळ बु. ३, पिं. काळे ५, नांदुरा २८, आलमपूर ३, पोटा ७८, टाकरखेड ८, तरवाडी ३, वडनेर ३, लोणार १४, बिबी १२, गायखेड ५, दे. कोळ ५, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील १, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील १, अैारंगाबाद येथील १, जालना जिल्ह्यातील विझोरा येथील २,  नागपूर येथील २ जणांचा यात समावेश आहे.
दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येतील ५५ वर्षीय व्यक्ती, बुलडाण्यातील रामनगरमधील ४८ वर्षीय व्यक्ती, शेगावातील श्रीरामनगरमधील ८९ वर्षीय व्यक्ती आणि मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ७१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  आतापर्यंत ३१३ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Four killed in Buldana district; 916 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.