गोठय़ाला आग; दोन लाखांचे नुकसान
By admin | Published: April 20, 2015 10:37 PM2015-04-20T22:37:30+5:302015-04-20T22:37:30+5:30
संग्रामपूर तालुक्यातील वरवट येथील घटना.
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : वरवट बकाल येथील एका शेतकर्याच्या रिंगणवाडी शिवारातील गोठय़ाला सोमवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान आग लागली. या आगीत गोठा जळून खाक झाला. वरवट बकाल येथील शेतकरी सुरेश विठ्ठलराव ढगे हे आपल्या रिंगणवाडी शिवारातील गट नं.८१ सकाळी गेले असता, वीज ताराच्या घर्षणामुळे शॉट सर्कीट झाल्याने गोठय़ास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सदर प्रकार लक्षात येताच ढगे यांनी आरडा ओरडा सुरू केली; परंतु शेजारच्या शेतातील शे तकरी मदतीला येण्यापूर्वीच गोठय़ाबाहेर बांधलेले वासरु जखमी झाले, तसेच गोठय़ातील शेतीपयोगी साहित्य, दोन पंप, पी.एच.सी.पाईप १00 नग, लोखंडी पाईप ५ नग डी.ए.पी.रासायनिक खत ५ बॅग १00 नग प्लास्टिक कॅरेट, लोखंडी पत्रे डवरे, नांगर यासह सुमारे दोन लक्ष रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतकरी ढगे हे हवालदिल झाले आहेत.