बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत महात्मा फुले जलभूमी अभियानातून विविध प्रकल्प व तलावांमधील गाळ काढण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामासाठी जेसीबी, पोकलंडसह निधीही उपलब्ध करून दिला व सदर निधी प्रत्येक तालुकास्तरावर तसेच विविध शासकीय यंत्रणांकडे सुपूर्दही केला आहे; मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गाळ काढण्याची मोहीम संपूर्ण जिल्हाभरात थंड बस्त्यात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन केले आहे. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जावे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पुर्णत्वास यावी, असे नियोजन आहे. कृषी विभाग, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांना गाळ काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांना तब्बल १ कोटी ५७ लाख ५९ हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या निधीचा विनियोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात वेळेची र्मयादा ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने जलयुक्त शिवार अभियानातील या महत्त्वाच्या कामाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी २५ मार्च रोजी सर्व यंत्रणांना पत्र पाठवून गाळ काढण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच उपविभागीय अधिकारी यांना हे अभियान ग ितमान होईल, या दृष्टीने तत्काळ पुढाकार घेण्याचेही निर्देश दिले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही.
निधी उपलब्ध, पण गाळ काढण्याची मोहीम थंड
By admin | Published: April 20, 2015 10:38 PM