खामगावात आढळल्या फंगस नॅट्स अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 03:13 PM2019-08-09T15:13:05+5:302019-08-09T15:13:14+5:30
जळगाव खांदेश येथे आढळून आलेल्या आणि सापासारख्या दिसणाºया अळ्या गुरूवारी खामगावातील किसन नगर भागात आढळून आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: एकाच वेळी हजारो आणि लाखोच्या संख्येने साखळी पध्दतीने चालणाऱ्या आणि विविध आकारमान बदलणाºया अळ्या खामगावात गुरूवारी दुपारी आढळून आल्या. त्यामुळे शहरातील किसन नगर भागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अळ्या धोकादायक नसून, नागरिकांनी घाबरण्याचे काहीही एक कारण नसल्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर आणि त्यांनतर जळगाव खांदेश येथे आढळून आलेल्या आणि सापासारख्या दिसणाºया अळ्या गुरूवारी खामगावातील किसन नगर भागात आढळून आल्या. त्यामुळे किसन नगरातील एका विद्यालयाजवळील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाहता पाहता ही वाºया वाºयासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सापासारख्या चालणाºया आणि शीस्तीत पथसंचलन करणाºया या अळ्या पाहण्यासाठी एकच गर्दी केली. विविध आकार बदलणाºया या अळ्यांची परिसरात चांगलीच दहशत पसरली. दरम्यान, या अळ्यांपासून घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
अळ्या धोकादायक नाहीत!
झुंडीनं आणि साखळी पध्दतीने चालणाºया फंगस नॅट्स अळ्यांची उपजिविका बुरशीवर तसेच सेंद्रीय घटकांवर चालते. १७-१९ दिवसांचा जीवनक्रम असलेल्या या अळ्या अजिबात धोकादायक नाहीत. ओलसर ठिकाणी या अळया आढळून येतात.
शहरातील किसन नगर भागात फंगस नॅट्स अळ्या आढळून आल्याची माहिती आपणांस मिळाली आहे. या अळ्या धोकादायक नसल्या तरी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी केली जाईल. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाईल.
-सौ. प्राजक्ता पांडे
आरोग्य पर्यवेक्षक,
नगर परिषद, खामगाव.
सापासारख्या दिसणाºया अळ्या दुपारी किसन नगर भागात आढळून आल्या. झुंडीच्या झुंडीने या अळ्या बाहेर पडत होत्या. या अळ्यांमुळे काही अंगावर शहारे उठले होते. परिसरातील नागरिक भयभित झाले होते.
- वैभव चौकट
किसन नगर, खामगाव