काेराेनाविषयक नियमांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:02+5:302021-07-22T04:22:02+5:30

वीज बिलाची वसुली थांबवावी बुलडाणा : काेराेनामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. तसेच अनेकांवर आर्थिक संकट काेसळले आहे. त्यामुळे, सक्तीने ...

The fuss of caring rules | काेराेनाविषयक नियमांचा फज्जा

काेराेनाविषयक नियमांचा फज्जा

Next

वीज बिलाची वसुली थांबवावी

बुलडाणा : काेराेनामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. तसेच अनेकांवर आर्थिक संकट काेसळले आहे. त्यामुळे, सक्तीने सुरू असलेली वीज बिलांची वसुली थांबवण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

ग्रामीण भागात बसची प्रतीक्षा कायम

माेताळा : काेराेना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, माेताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही.

संगम तलावातील जलपर्णी काढा

बुलडाणा : शहराचे वैभव असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या इंग्रजकालीन ऐतिहासिक संगम तलावाचे संपूर्ण क्षेत्र जलपर्णी या वनस्पतीने मागील दोन महिन्यांपासून व्यापून टाकले आहे. या तलावातील जलपर्णी काढण्याचे निर्देश नगर पालिकेला आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत़

अंढेरा पाेलीस स्टेशनला मिळाले राेहित्र

अंढेरा : वारंवार वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने पाेलीस स्टेशनचे कामकाज प्रभावित हाेत हाेते़. डीपीडीसीअंतर्गत मंजूर असलेले विद्युत रोहित्र उभारण्याची पाेलीस अधीक्षकांनी परवानगी दिली. परवानगी मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी विद्युत रोहित्र बसवण्यात आले.

सीड्स कंपनीचे कार्यालय फाेडले

देऊळगाव राजा : येथील शिंगणेनगर भागातील सीड्स कंपनीचे कार्यालय अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना १७ जुलैरोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवा

बुलडाणा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जिल्हा बुलडाणाच्यावतीने १९ जुलैरोजी जिल्हाधिकारी यांना मेडिकलच्या नीट प्रवेशामधून ओबीसी विद्यार्थ्यांचे २७ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले. ते पूर्ववत ठेवण्याची मागणी करण्यात आली़

Web Title: The fuss of caring rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.