शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

गणेश मंडळांचा महावितरणाला शॉक

By admin | Published: September 02, 2014 10:46 PM

बुलडाणा जिल्ह्यात ४४ गणेश मंडळाने घेतली अधिकृत वीजजोडणी;अनधिकृत जोडणीविरूद्ध दामिणी पथकाची कारवाई.

बुलडाणा : गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी या वीज कंपनीच्या आवाहनाला गणेश मंडळांनी चांगलाच शॉक दिला असून आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ४४ गणेश मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. ज्या मंडळाने अनधिकृत विज जोडणी केली आहे. अशा मंडळाला महावितरण कंपनीचे दामिनी पथक भेटून अधिकृत कनेक्शन घेण्याची सक्ती करीत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक ८८१ गणेश मंडळाची स्थापना झाल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली असली तरी आणखी छोटे-मोठे अनेक मंडळे आहेत की, ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आणि देखाव्यांची भव्यता पाहाता अनधिकृत जोडणी प्रसंगी धोकादायक ठरू शकते. अनेक गणेश मंडळे जवळच्या महावितरणच्या पोल वरून अनधिकृतपणे विज जोडणी करून विज घेतात. यावर्षी श्रीगणेश १0 दिवसासाठी भक्तांच्या भेटीला आले आहेत. या १0 दिवसासाठी कशाला अधिकृत कनेक्शन घ्यायचे, असा विचार करून अनेक गणेश मंडळाने अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत. तर काहींनी मंडळातील सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पुरते कनेक्शन घेत आहेत. बुलडाणा शहरातील फक्त १५ गणेश मंडळाने आजपर्यंत अधिकृतरित्या अर्ज देऊन विज कनेक्शन घेतले आहे. याशिवाजय खामगाव शहरात २४ तर मलकापूर शहरात ५ गणेश मंडळाने अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत. त्यावरून जिल्ह्यात अनधिकृत कनेक्शन घेणार्‍यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे महावितरणाला लाखों रूपयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर येणार्‍या उत्सव काळात मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर होणार आहे. त्यामुळे अशी अनधिकृत विज कनेक्शन धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत कनेक्शन घ्यावे, यासाठी महावितरणचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अनधिकृत कनेक्शन धोकादायक असते. अधिकृत जोडणी घेतल्यास अपघात होण्याची शक्यता फारच कमी असल्याने गणेश मंडळांनी धोका पत्करू नये.अधिकृत जोडणी करण्यासाठी महावितरणचे दामिनी पथक मंडळांना भेटी देऊन अधिकृत कनेक्शनसाठी आवाहन करीत असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगीतले आहे. *कमी दरात विज उपलब्धधार्मिक उत्सवासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून दिली जात असल्याने गणेशोत्सवासाठीही अगदी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत वीजजोडणी घेणार्‍या मंडळांना ३.७५ रुपये प्रतियुनिट याप्रमाणे वीज आकार आकारला जातो. दहा दिवसांसाठी मंडळांकडून पर किलोवॅट प्रमाणे एक हजार रुपये इतके डिपॉझिट घेतले जाते. हे डिपॉझिट बिल अँडजेस्ट करून उर्वरित रक्कम संबंधित मंडळाला चेकच्या माध्यमातून परत केली जाणार आहे.*गणेशोत्सव काळात भारनियमन नाही गणेशोत्सव काळात कुठेही भारनियमन केले जाणार नसल्याचे राज्य शासानाने जाहीर केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी भारनियमन लागू आहे. त्या ठिकाणचे देखील भारनियमन गणेशोत्सव काळात बंद केले जाणार असल्याची माहिती आहे.