लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात विविध गैरप्रकार घडल्याचे समोर येत असतानाच खामगाव येथील सामान्य रूग्णालयात बनावट अहवाल तयार करून देणाºया एकास गुरूवारी पहाटे अटक केली आहे. सामान्य रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विजय राखांडे रा.पहुरजीरा ता. शेगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा खामगाव आणि परिसरातील अनेकांना फटका बसला. अनेकजण या संक्रमणाने बाधित झाले. त्याचवेळी या संसर्गामुळे मिळत असलेल्या दीर्घकालीन सुटी आणि विम्याचा आर्थिक लाभ लुटण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांनी साथ दिल्याचे समोर येत आहे. खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल रूग्णांचा दुसºयांदा स्वॉब घेत, खासगी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यातील कामगारांना पॉझिटिव्ह आणण्याचा गोरखधंदाच, कोरोना काळात चालविण्यात आला. एकापेक्षा अनेकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने बनावट अहवाल देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी सामान्य रूग्णालयाचा कंत्राटी कामगार विजय राखोंडे याच्यासह इतरांविरोधात भादंवि कलम ४२० अन्वये तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सतर्क झालेले आरोपी फरार झाल्याचे समजते.
कंत्राटी कर्मचाºयांचा प्रताप; विम्याचा दिला अनेकांना लाभ!- शहरातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यासह परिसरातील इतर उद्योगामध्ये काम करणाºया कर्मचाºयांना विम्याच्या लाभासाठी सामान्य रूग्णालयात कंत्राटी असलेल्या कर्मचाºयांकडून संगनमताने हा प्रकार करण्यात आला. यामध्ये एकापेक्षा अधिक आरोपी गुंतल्याची शक्यता समोर येत असून, पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. जनुना रोडवरील एका खासगी कंपनीतील अनेक कामगारांनी बनावट अहवालाद्वारे विम्याचा लाभ घेतल्याची जोरदार चर्चा आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आणि त्याच्या साथीदाराने प्रयत्न केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांत सविस्तर तक्रार दाखल केली आहे. सामान्य रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अनुपस्थितीत हा प्रकार करण्यात आला.-डॉ. निलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रूग्णालय, खामगाव.
कोरोना विषाणू संक्रमित असल्याचा बनावट अहवाल देणाºया टोळीतील एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव.