गणेशोत्सवाची अखंड परंपरा गोसावीनंदन गणपती
By admin | Published: September 1, 2014 10:21 PM2014-09-01T22:21:50+5:302014-09-02T00:54:30+5:30
राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्या मातृतिर्थ सिंदखेडराजा या ठिकाणी सुमारे ३५0 वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे.
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असणार्या मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीला ऐतिहासिक सोबतच धार्मिक, अध्यात्मीक परंपरेचा वारसा लाभलेला असून, या ठिकाणी सुमारे ३५0 वर्षापूर्वी श्री संत गोसावीनंदन यांनी स्थापन केलेल्या गणेश उत्सवाची परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. या मंदिराचे २ कोटी रुपयांचे बांधकाम करण्यात येत आहे. नेत्री दान हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजरे, माया शेंदुर पाझरे, वरोवरी दुवांकराचे तुरे. या स्तवनाचे रचिते संत गोसावीनंदन यांच्या महतीचा अध्यात्मीक वारसा मातृतिर्थ नगरीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असणारे येथील संतवर्य गोसावीनंदन स्वामी यांचे पूर्वज मराठवाड्यातील बिड (गंगातीर) येथील राहणार असून, गोसावीनंदन स्वामींनी श्रीक्षेत्र मोरगाव येथील तपश्चर्या केल्यावर त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन सिद्धक्षेत्र सिंदखेडराजा येथे जाण्याची आज्ञा केली, अशी अख्यायिका आहे. गोसावीनंदन यांचे चरित्र अभंगावरुन ते प्रत्यक्षात श्री गणेशाचेच अवतार होते असे, ह्यम्हणे आव मोठा देखिला गोमटा, आता तुझे पोटा शिघ्र येते, जगाचा उद्धार व्हावया अवतार स्वयं गणेश्वर घेई ऐसी.ह्ण या ओवीवरुन सिद्ध होते. येथील त्यांच्या वास्तव्य काळामध्ये श्री गोसावीनंदन यांनी रचलेली अनेक गणेशस्तवन, आरत्या, देवीचे पदे, कवणे प्रचलीत असून त्यांचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. गोसावीनंदन यांनी ३५0 वर्षापूर्वी सुरु केलेला गणेशोत्सव आजही त्याच श्रद्धेने मातृतिर्थ नगरीत साजरा होतो. काळ्या मातीपासून पर्यावरण पुरक उत्सव मुर्ती दरवर्षी स्थानिक शिल्पकार तयार करतात. या मुर्तीची प्रतिष्ठापणा करुन गणेशोत्सव साजरा केला जातो.