शिक्षकांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:00+5:302021-05-22T04:32:00+5:30
बांधावरच वाद आता गावातच साेडवू साखरखेर्डा : दरवर्षी पेरणीपूर्व वादाचे पर्यवसान भांडणात होऊन शेतकऱ्यांना पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात. ...
बांधावरच वाद आता गावातच साेडवू
साखरखेर्डा : दरवर्षी पेरणीपूर्व वादाचे पर्यवसान भांडणात होऊन शेतकऱ्यांना पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात. यातील अनेक वाद किरकोळ स्वरूपाचे असतात. या वादाचे निवारण गाव पातळीवरच होते़. हे वाद सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा विचार करून त्या सोडविण्यासाठी त्याच गावात प्रयत्न करू, असा निर्णय ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी घेतला आहे.
अन्न व्यावसायिकांनी वार्षिक परतावा सादर करावा
बुलडाणा : जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक जे विविध अन्नपदार्थांचे उत्पादन पॅकिंग, रिपॅकिंग करतात, अशा सर्वांनी अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सादर करावयाचे वार्षिक विवरणपत्र फार्म डी-१ हे यापूर्वी कार्यालयात सादर केले जायचे, तथापि अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार ते ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
ओव्हरलाेड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी ते शेवली रोडवर तर राहेरी सोनोशी-आडगावराजा या मार्गावर दररोज वाळू वाहतूक करणारे टिप्पर ये-जा करीत आहेत. मात्र, वाळू वाहतूक करणारे हे टिप्पर गावा लगत सुसाट वेगाने वाहतूक करत आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताची शक्यता वाढली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा
लाेणार : जीवनावश्यक किराणा मालाचे भाव वाढलेले नसतानाही व्यापारी चढ्या दराने विक्री करत आहेत. टंचाईच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. किराणाची जादा दराने होणारी विक्री थांबविण्याची मागणी प्रकाश सानप यांनी केली आहे.
साखरखेर्डा ते पिंपळगाव साेनारा रस्त्याची दुरवस्था
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा ते पिंपळगाव सोनारा मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या मार्गाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली जात आहे.
पिंपळगाव सोनारा येथे जाण्यासाठी साखरखेर्डा येथून एकमेव मार्ग आहे.
धामणगाव परिसरात अवैध दारू विक्री वाढली
धामणगाव बढे : परिसरात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात वाढली आहे. १७ मे राेजी पाेलिसांनी पाेफळी फाट्यावर कारवाई करून दारू जप्त केली हाेती. परिसरातील अनेक गावांमध्ये दारू विक्री सुरू असून, पाेलिसांनी कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
लिलाव नसलेल्या घाटातून रेतीचा उपसा
किनगाव राजा : चांगेफळ येथील घाटातून लिलाव झालेला नसतानाही अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी अशोक मोगल यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
बुलडाणा : शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका २५ वर्षीय युवकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. विजय नितीन लहाने रा.बुलडाणा असे आरोपीचे नाव आहे.
शेतमाल घरातच पडून, शेतकरी त्रस्त
बुलडाणा : कोरोनाच्या संसर्गामुळे बाजार समित्याच बंद असल्याने शेतमाल घरातच पडून आहे. शासनानेही शेतकऱ्यांच्या माल खरेदीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे खरिपाचा हंगाम तोंडावर असताना, रब्बीचेच पैसे हातात खेळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
वाघजाळ फाटा ते धामणगाव रस्त्याची दुरवस्था
माेताळा : तालुक्यातील वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे या मार्गाची मागील काही दिवसांपासून अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. खड्डयातून मार्ग काढताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
फाेटाे स्टुडिओची दुकाने सुरू ठेवा
बुलडाणा : शासन नियमानुसार फोटो स्टुडिओची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शहरासह तालुक्यातील फोटो स्टुडिओ संचालकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
सरपंचांनी मानधन दिले मुख्यमंत्री निधीला
सिंदखेडराजा : राज्य शासनाकडून सरपंचांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनातून पाच हजार रुपयांचा धनादेश सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील सरपंचांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे.
हिवरा आश्रम येथे काेविड केअर सेंटर सुरू
हिवरा आश्रम : येथील शासकीय कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या रुग्णालयात वीस बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमुळे परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.