मोताळा : तालुक्यातील तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्या संदर्भात राज्य शासनाने मंजुरी देऊन कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली. सर्व सोयी सुविधा परिपूर्ण असताना सुद्धा दोन वर्षापासून कृषि महाविद्यालयाचा प्रश्न मंजुरातीवरच असल्याने कृषीवलांना कृषि महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे. मोताळा तालुक्यातील ग्राम तळणी येथील दिलीप नाफडे यांनी तत्कालीन कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना २० डिसेंबर २०१५ रोजी बुलडाणा जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय असावे, असे लेखी निवेदन दिले होते. राज्यात मागासलेला जिल्हा म्हणून सर्व परिचित असलेल्या बुलडाणा जिल्हा व त्यातील अधिकच मागासलेल्या मोताळा तालुक्यातील तळणी परिसरात कृषी महाविद्यालय झाल्यास त्याचा परिसरातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल शिवाय तालुक्यात कुठेही कृषी संबंधित शासकीय, शैक्षणिक, संशोधन, संस्था किंवा महाविद्यालय उपलब्ध नाही, असे असताना तालुक्यात मंजुर झालेले कृषी महाविद्यालय होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक जागेकरिता तळणी येथील ग्रामपंचायतने २ आक्टोबर २०१५ रोजी एकमताने ठराव घेऊन १५० एकर जमीन महाविद्यालयासाठी बिना मोबदला उपलब्ध करून दिली. तळणी येथे महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक असणाºया सिंचनाची सोय असलेल्या नळगंगा प्रकल्प अवघ्या दीड किलो मीटर अंतरावर असून दळणवळणाची रेल्वे स्टेशन सुद्धा १० कि.मी. अंतरावर उपलब्ध आहे. तळणी येथे कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या पथकाने तळणी येथे भेट देऊन सर्वेक्षण केले. मात्र, अद्यापही माहविद्यालयाच्या कामाचा मुहूर्त दिसून आला नाही. गेल्या दोन वर्षापासून कृषी महाविद्यालयाचा प्रश्न एैरणीवरच पडला आहे.
तळणी येथील शासकीय कृषी महाविद्यालय दोन वर्षापासून मंजुरातीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:41 PM
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्या संदर्भात राज्य शासनाने मंजुरी देऊन कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली.
ठळक मुद्दे कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली. सर्व सोयी सुविधा परिपूर्ण असताना सुद्धा दोन वर्षापासून कृषि महाविद्यालयाचा प्रश्न मंजुरातीवरच असल्याने कृषीवलांना कृषि महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे.आवश्यक जागेकरिता तळणी येथील ग्रामपंचायतने २ आक्टोबर २०१५ रोजी एकमताने ठराव घेऊन १५० एकर जमीन महाविद्यालयासाठी बिना मोबदला उपलब्ध करून दिली.