बुलडाणा जिल्ह्यात ग्रामसेवकांचा पंचायत समित्यांसमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:40 PM2018-06-18T18:40:14+5:302018-06-18T18:40:14+5:30
बुलडाणा : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनासोबत बेमुदत असहकार आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील पंचायत समितीसामोर राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेतर्फे १८ जून रोजी आयोजित ठिय्या आंदोलन सहभाग घेतला
बुलडाणा : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनासोबत बेमुदत असहकार आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील पंचायत समितीसामोर राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेतर्फे १८ जून रोजी आयोजित ठिय्या आंदोलन सहभाग घेतला. आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ग्रामसेवक युनियनने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. गत १ जून पासून जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी प्रशासनासोबत असहकार आंदोलन सुरू केले आहे. १२ व २४ वर्षे कालबद्ध पदोन्नती काढणे, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाºयांना पदोन्नती, राष्ट्रीय पेन्शन योजनेचा अद्ययावत हिशोब मिळावा, वेतनासोबत ४०० रुपये वाहन भत्ता, कंत्राटी सेवा पूर्ण करणाºयांना कायम करावे, निलंबीत कर्मचाºयांना पुन:स्थापना विभागीय चौकशी प्रकरणे तातडीने निकाली काढावा, वैद्यकिय बिलांना मंजूरी, आंतरजिल्हा बदली प्रकरणे, सन २०१८ ची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, १ तारखेला वेतन आदी १८ मागण्यांसाठी हे विविध टप्प्यातील आंदोलन राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे आणि जिल्हाध्यक्ष व्ही.आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा, सिंदखेडराजा, लोणार, मलकापूर, नांदूरा पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान १ जूनपासून सुरु झालेल्या असहकार आंदोलनांतर्गत सभांवर बहिष्कार, अहवाल बंद, तपासणी बंद करण्यात आली आहे. यामुळे पंचायत समित्यांचे प्रशासकीय कामकाज विस्कळित झाले आहे. संघटनेने मागण्यांची पुर्तता होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला असून पुढील टप्प्यात २५ जून रोजी जिल्हा परिषदेवर धरणे देण्यात येणार असून २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल. १६ जुलैपासून जिल्हा पदाधिकारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. दरम्यान ग्रामसेवक युनियनने १८ जून रोजी जिल्ह्यातील पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. बुलडाणा पंचायत समितीसमोर जिल्हाध्यक्ष व्ही.आर.चव्हाण यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात राजेश्वर खेडेकर, तालुकाध्यक्ष प्रमोद कोल्हे, रविंद्र बोबडे, प्रभाकर कानडजे, योगेश मुळे, भगवानराव धंदार, एन.जे.उगले, संदीप शिंदे, राज जाधव, के.के.तायडे, ज्याती मगर, एस.एस.सोनुने, अरविंद टेकाळे, बी.एन.बोरकर, एस.एस.बाजड, व्ही.बी.राऊत, माणिकराव शेळके, चंद्रशेखर जोशी, डी.डी.दराखे, एस.पी.नरवाडे, एम.ए.महामुने, डी.टी.बिबे, व्ही.आर.पंडीत आदी ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी सहभागी झाले होते.