लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सन १९४२ मध्ये भारतीयांना ‘करा वा मरा’ असा संदेश, तर ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’चा इशारा महात्मा गांधींनी दिला. त्यातून सुरू झालेल्या क्रांतीस ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या आंदोलनाचा स्मृतिदिन म्हणून बुधवारला चिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र सैनिक स्मारकास व महापुरुषांना वंदन करून साजरा करण्यात आला. प्रारंभी नगर परिषदेतील स्वातंत्र सैनिकांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची साफसफाई करून हार अर्पण करण्यात आले. तसेच शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करून अभिवादन करण्यात आले. अशोक वाटिकेत राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला माजी आमदार बाबुराव पाटील, जनुभाऊ बोंद्रे, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोंद्रे, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती ज्ञानेश्वर सुरूशे, नगरसेवक दीपक खरात, अ.राउफ, राजू रज्जाक, विजय गाडेकर, दीपक थोरात, सचिन बोंद्रे, गौरव देशमुख, अश्विन जाधव, हाजी हानिफ, प्रशांत देशमुख, तुषार भावसार, बिदुसिंग इंगळे, किशोर कदम, प्रमोद पाटील, मोहन खंडेलवाल, गयाज बागवान, राजू ठेंग, मकरंद भटकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..
क्रांतिदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादनबुलडाणा : भारतीय जनता पार्टी मोताळा तालुक्याच्यावतीने क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मनोहर नारखेडे, नामदेवराव धोटे, निना धनोकार, नंदु किनगे संचालक सूतगिरणी, माजी सैनिक देवीदास वानखेडे, शिवशंकर राऊत, डॉ.दिवाकर शिंदे, विनोद मापारी, साहेबराव शिंबरे, अनिल गोंड, गोपाळ गोंड, o्रीराम ठाकरे, अमोल वाढे, लक्ष्मण बुडूकले, दत्ता धनोकार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.