पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:43+5:302021-07-29T04:33:43+5:30

साखरखेर्डा : सवडद आणि मोहाडी येथील नदीकाठची शेती आमखेड पाझर तलाव फुटल्यामुळे खरडून गेली होती. त्या जमिनीची पाहणी ...

The Guardian Minister inspected the flooded area | पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

Next

साखरखेर्डा : सवडद आणि मोहाडी येथील नदीकाठची शेती आमखेड पाझर तलाव फुटल्यामुळे खरडून गेली होती. त्या जमिनीची पाहणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी २५ जुलै रोजी केली.

मोहाडी ते माळखेड रस्त्यावर जवळपास ५५० हेक्टर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे. पेरलेले बियाणे , उगवलेले पीकही वाहून गेले आहे. ज्यांच्या जमिनी खरडल्या त्या जमिनीत पीक येत नाही, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली . तसेच मोहाडी ते माळखेड या रस्त्यावर कोराडी नदी असून लोक वर्गणीतून बांधलेला पूल वाहून गेला आहे. जि.प. सदस्य दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद गटनेते रामभाऊ जाधव, चनु देशमुख, गजानन बंगाळे , अरुण वाघ, सरपंच अशोक रिंढे, तेजराव देशमुख, विलास आबा रिंढे, दिलीप काळे,बबनराव रिंढे,भगवान रिंढे,श्रीधरराव काळे,भागवत काळे,कैलास रिंढे,दत्तात्रय रिंढे,गजानन काळे पाटील, शेषराव काळे,उपसरपंच किसनराव साळवे, पोलीस पाटील शिवाजी रिंढे , तहसीलदार सुनील सावंत यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश

पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने काेराडी नदीवरील लाेकवर्गणीतून बांधलेल्या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी सरपंच अशोक रिंढे यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ़ राजेंद्र शिंगणे यांनी सवडद , मोहाडी या गावातील पूरग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले़ तसेच सवडद ते गजरखेड , मोहाडी ते माळखेड रस्त्यावरील पुलाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेशही दिले़

Web Title: The Guardian Minister inspected the flooded area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.