कृषी दूतांकडून फळ व भाजीपालानिर्मितीविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:33+5:302021-04-21T04:34:33+5:30

निव्वळ उत्पादनावरच न थांबता वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती ...

Guidance on fruit and vegetable production from agricultural envoys | कृषी दूतांकडून फळ व भाजीपालानिर्मितीविषयी मार्गदर्शन

कृषी दूतांकडून फळ व भाजीपालानिर्मितीविषयी मार्गदर्शन

Next

निव्वळ उत्पादनावरच न थांबता वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील कृषी दूतांनी केले. यावेळी कृषी दूत अमोल शिंगणे, शुभम घुघे, कुशल देवकर, आकाश गोतरकर, गणेश बिहाडे, हरीश ब्रमणकर, विजय घुगे, सर्वांश डहाळे, सूरज काळदाते, विशाल गोरे यांनी देऊळगाव मही येथे मार्गदर्शन केले. फळ व्यवसायाचा दृष्टिकोन बदललेला व फळ व्यावसायिकाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भारत एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. अनादि काळापासून

शेतीची कामे करण्यासाठी फळबागा संवर्धन करून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्यात आला आहे. भारतात फळे मुबलक उपलब्धता लक्षात घेऊन त्यावर प्रक्रिया मूल्यवर्धन केल्यावर त्याला बाजार भाव जास्त मिळू शकेल. फळ प्रक्रिया म्हणजे उपलब्ध फळांवर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात. कैरी लोणचे, आलू चिप्स, केळी चिप्स, अननस ज्यूस, टोमॅटो केचप असे सारे पदार्थ बनविता येतात. हे सारे पदार्थ कशाप्रकारे बनवायचे आणि बनविल्यानंतर कशाप्रकारे विकायचे आणि कसा नफा मिळवायचा, याचे पूर्ण प्रशिक्षण या वेळेस कृषी दूतांनी शेतकऱ्यांना दिले. प्रा. डॉ. राम खर्डे आणि प्राध्यापिका वृषाली चिमोटे, प्राध्यापक

रोहित कानोजे व इतर प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन केले. या वेळेस शेतकरी गणेश शिंगणे, दीपक गवरे, तुषार खरात, रवी शिंगणे आदी उपस्थित होते.

Web Title: Guidance on fruit and vegetable production from agricultural envoys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.