मलकापूर (जि. बुलडाणा): सुरक्षित व आरामदायी प्रवास व्हावा म्हणून प्रवासी खासगी वाहनांपेक्षा राज्य परिवहन मंडळाच्या बसला प्राधान्य देतात; परंतु प्रवासी हेच आमचे दैवत असे घोषवाक्य असणार्या एसटी महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय होत आहे. मलकापूर बस स्थानकावरील समस्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणार्या मलकापूर शहर येथील बसस्थानकात खड्यांची भरमार आहे. बसस् थानकात प्रवेश केल्यावर बस खड्डयातून जात असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो. बसस्थानक परिसराच्या सभोवताल दुर्गंधीही पसरली असल्याने या समस्येपासून मुक्त करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनासमोर आहे. बसस्थानकाच्या इन व आऊट प्रवेशव्दारावरील मार्गावरील डांबर उखडलेले असल्याने गिट्टी सर्वत्र पसरली आहे. या बसस्थानकापासून राज्य परिवहन मंडळाला प्रतिदिन लाखो रूपयाची कमाई प्राप्त होते. परंतु प्रवाशांच्या समस्यांकडे स्थानिक बसस्थानक प्रमुख कोणतेही लक्ष देत नाही. प्रवाशांना सुविधा व्हावी या उद्देशाने राज्य परिवहन निगमची स्थापना करण्यात आली आहे. बहुजन हिताच बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याने हा व्यवसाय सुरू झाला. परंतु समय बिताओ और पैसा कमाओ या धर्तीवर काम करणार्या परिवहन अधिकार्यांच्या प्रतापामुळे त्रस्त होऊन प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसकडे किंवा काळी-पिवळी कडे धाव घ्यावी लागते. मलकापूर बसस्थानकाची समस्या मुख्य प्रवेशव्दारापासून सुरू होते. शहरातील या मुख्य बसस्थानकातील समस्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीला प्रारंभ झाला असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बसस्थानकात विजेची समस्या नाही. परंतु स्वच्छतेबाबत उदासिनता दिसुन येते. फलाट व प्रवासी बसत असलेल्या ठिकाणी स्वच्छता दिसून येते. परंतु बसस् थानकाच्या सभोवताल स्वच्छतेच्या मोहीमेला हरताळ फासलेला दिसतो. बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे येथे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसुन येते बसस्थानकात पुरूष व महिला प्रसाधनगृह असले तरी पुरूष मंडळी बसस्थानक परिसरात उघड्यावर मुतारीसाठी जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले आहे.
गुटखाविक्री बंदीचा फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2015 1:42 AM