लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याच्या आधुनिक युगात माेबाईलचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांना फेसबुक आणि व्हाॅटसॲपचे वेडच लागल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. काही विकृत मानसिकतेचे लाेक साेशल मीडियावरही महिलांचा छळ करीत असल्याचे चित्र आहे. अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही़. सन २०१८ ते २०२१च्या जुलैपर्यंत ३२ महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक मुलींचे फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्राम, टि्वटर आदींवर अकाऊंट आहे़ बहुतांश मुली आपले फाेटाे समाज माध्यमावर टाकत असतात. त्याचा दुरुपयाेग करून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करतात़ काही मुले मुलींना वारंवार फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, अश्लील मॅसेज पाठवणे, व्हाॅटसॲपवर अश्लील चित्रफित टाकणे आदी प्रकार करून मुलींचा छळ करीत असल्याचे चित्र आहे. अनेक मुली बदनामीच्या भीतीने पाेलिसात तक्रार करीत नसल्याने अशा गुन्हेगारांवर वचक बसत नाही. त्यामुळे तक्रार करण्याची गरज आहे.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक गत काही वर्षांत हे प्रकार माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ अनेक मुली बदनामीच्या भीतीने तक्रारच करीत नाहीत़ अनेकदा युवती, महिलांना अश्लील मॅसेज येतात. अश्लील व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतात. यात नातेवाईक, जवळच्या महिला, शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार करतात. हे व्हिडिओ दाखवून त्यांचे वारंवार शोषण करतात. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक युवती, महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे़.
अनेक महिलांचा फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्रामवर छळ केला जाताे़ बदनामीच्या भीतीने अनेक महिला व मुली तक्रार करीत नसल्याचे चित्र आहे. असा प्रकार घडलेल्या युवती व महिलांनी समाेर येऊन तक्रार करावी. महिला आणि युवतींचे नाव गुप्त ठेवले जाते. - प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक,सायबर सेल