दिल्लीतील राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनात बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:34 PM2018-03-10T18:34:45+5:302018-03-10T18:34:45+5:30
बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.
बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. दहा मार्च पासून हे संमेलन संसदेच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहामध्ये सुरू झाले आहे. ११ मार्च रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पुण्याच्या आमदार मेघा कुळकर्णी (भाजप) आणि औरंगाबादचे राष्ट्रवादी काँग्रेचे विधान परिषदेवरील आ. विक्रम काळे यांना या संमेलनात सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ‘शाश्वत विकास’ हा मुद्दा घेऊन हे संमेलन यावळी होत आहे. या संमेलनात प्रामुख्याने शाश्वत विकास साध्य करण्याच्या दृष्टीने मानव संसाधन विभाग, कृषी आणि आरोग्य क्षेत्रात काय पावले उचलल्या जावीत, उपाययोजना काय केल्या जाव्यात यासोबतच अशा उपाययोजना राबवितांना लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी, अशा अनेक बाबींचा यात उहापोह केल्या जात आहे. त्यानुषंगाने बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. पैनगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासह, पाणीप्रश्नी तथा ग्रामविकास आणि पंचायत राज या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. सोबतच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव असलेले हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहे. पंचायतराज व्यवस्था या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे