अवाजवी वीज देयकांनी वाढविली ग्राहकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 06:35 PM2019-01-04T18:35:11+5:302019-01-04T18:35:35+5:30

अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या कित्येक महिण्यापासुन महावितरणचा दुर्लक्षीत कारभार सुरू असून ग्राहकांना रिडींगनुसार देयके दिल्या जात्नाहीत. त्यामुळे अवाजवी वीज देयके ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

The headache of the customers created by unbounded electricity payments | अवाजवी वीज देयकांनी वाढविली ग्राहकांची डोकेदुखी

अवाजवी वीज देयकांनी वाढविली ग्राहकांची डोकेदुखी

Next

अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या कित्येक महिण्यापासुन महावितरणचा दुर्लक्षीत कारभार सुरू असून ग्राहकांना रिडींगनुसार देयके दिल्या जात्नाहीत. त्यामुळे अवाजवी वीज देयके ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 
देऊळगाव राजा तालुका अंतर्गत येणारे देऊळगाव मही व अंढेरा, येथे ३३ के. व्ही. उपकेंद्र आहे. देऊळगाव मही येथुन पाडळी शिंदे, सुरा, सरंबा, नागनगांव, सावखेड नागरे तर अंढेरा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रा अंतर्गत सेवानगर, पिंप्री आंधळे, मेंडगाव, बांयगाव, शिवणी आरमाळ अशा एकुण १२ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु गेल्या एक वर्षापासुन ग्राहकांना दर महिण्याला विद्युत देयके दिली जातात, परंतु ज्या ठेकेदाराला विद्युत रिंडींगचे काम दिले आहे, त्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना रिडींग प्रमाने विद्युत देयके न देता अव्वाच्या सव्वा देयके देऊन ग्राहकांची आर्थिक लुट सुरु आहे. याबाबत देऊळगाव राजाचे उपकार्यकारी अभियंता दहिकर यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. तालुक्यात हजारोच्या संख्येने वीज ग्राहक असुन विद्युत मिटरची संख्या हजारोच्या घरात आहे. परंतु ज्या ठेकेदाराकडे विद्यत रिडींग घेण्याचे काम आहे, त्यांत्याकडून अंदाजे मिटर रिडींग टाकुन हजारो रुपयांची दियके दिल्या जात आहेत. महावितरण विभागाकडुन विद्युत बिलाची रक्कम थकबाकीच्या नावाखाली सक्तीने वसुल केल्या जात असुन ती रक्कम भरुन सुध्दा विद्युत बिलात ती रक्कम व्याजासह लागुन येत असल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. तसेच विद्युत बिलावर रिडींग घेतल्याचा फोटो सुध्दा येत नाही.
 
देयकांच्या दुरूस्तीसाठी गाठावे लागते देऊळगाव राजा
अंढेरा ३३ के. व्ही. उपकेंद्र येथील कनिष्ठ अभियंता भोकन हे सतत गैरहजर राहत असल्याने ग्राहकांना  देऊळगाव राजा येथे जाऊन विद्युत देयके दुरुस्त करावे लागतात. ग्राहकांना वेळेवर विद्युत देयके दिल्या जात नाही. रिडींग घेणारे सुध्दा गावात येत नसल्याने अडचणी वाढतच आहेत. 


अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव 
देऊळगाव राजाचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. दहिकर यांच्याशी फोनवर विचारणा केली असता या प्रकरणावर दे.मही कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चित्तोडे व अंढेराचे कनिष्ठ अभियंता भोकण यांना या विषयावर उत्तरे देण्याचे सांगतो, असे ते म्हणाले. दे.मही कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चित्तोडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता; विद्युत देयके हा विषय उपकार्यकारी अभियंता देऊळगाव राजा यांच्या अंतर्गत येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंढेराचे कनिष्ठ अभियंता भोकन यांच्याशी विचारणा केली असता तुम्हाला नंतरला बोलतो असे सांगून टाळले. या प्रकारामुळे अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. 

Web Title: The headache of the customers created by unbounded electricity payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.