बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. सुदैवाने यातील सर्वजण सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे.प्रामुख्याने या १७ जणामध्ये घाटाखालील विशेषत: शेगाव तालुक्याच्या परिसरातील नागरिकांची संख्या अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी पाहता स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालायत आतापर्यंत पाच जणांना तर खामगाव येथील रुग्णालयात एकाला आणि शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ११ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने दाखल केले होते. सहा वर्षाच्या मुलापासून ते ६५ वर्षाच्या वृद्धापर्यंतचा यामध्ये समावेश आहे. दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताच फटका बसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या कपील एकनाथ हिवाळे (२०), नीलेश एकनाथ मिसाळ (२३), गायत्री कडूबा अव्हाड (६), शेख शकील शेख सलीम (६) आणि रमेश सीताराम पवार (४०) यांना सुटी देण्यात आली आहे. खामगाव येथेही दाखल करण्यात आलेल्या शत्रूघ्न इंगळे यासही सुटी देण्यात आली आहे. शिरपूर, नांद्राकोळी, धाड, धावडा आणि बुलडाण्यातील मिलींदनगरमधील या व्यक्ती रहिवाशी आहे.
शेगाव रुग्णालयात संख्या अधिकउष्माघाताच्या उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या शेगाव रुग्णालयातील आहे. माहदेव सुखदेव वाकेकर (मलकापूर), रामदास श्रीराम आव्हाड (चांगेफळ, जळगाव जामोद), बालू भावराव वानखेडे (शेगाव), रमाबाई भघवान म्हस्के (चांगवा, संग्रामपूर), शालिग्राम तुळशीराम उमरावाटे (सगड, अकोला), बाळकृष्ण रामकृष्ण गवई (शेगाव), बाबाराव वामन इंगळ (चिंचोली, शेगाव), सुनील ग्यानसींग खानंन्दे (मुक्ताईनगर, जळगाव खान्देश), संजय किसन पवार (शेगाव), अंबादास विठोबा सुरूशे (गोलखेड, शेगाव), सुनील श्यामराव नानंदे (शेगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, उष्माघाताचा फटका बसलेल्या या सर्व व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे.