सुलतानपूर - वेणी रस्त्याची दुरवस्था
सुलतानपूर : येथून जवळच असलेल्या सुलतानपूर-वेणी रस्त्याची पहिल्याच पावसाने दुरवस्था झाली आहे. पहिल्या पावसामध्येच हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
लसीकरणाविषयी शिक्षकांनी केले मार्गदर्शन
माेताळा : कोरोना या आजारासोबतच लसीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंब सर्वेक्षण अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे यांनी केले.
पाेखरा याेजनेत वंचित गावांचा समावेश करा
देऊळगाव राजा : पोखरा योजनेत तालुक्यातील वंचित गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोखरा योजनेत देऊळगावराजा तालुक्यातील ४८ गावांपैकी फक्त चारच गावांचा समावेश करण्यात आला आहे.
खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. थाेडा जरी पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येताे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
सुलतानपूर : गतवर्षी सुलतानपूर मंडळासह लोणार तालुक्यातील खरीप पिकाची अंतिम पैसेवारी ४७ पैशाच्या आत येऊनही अद्यापपर्यंत ९० टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. पंतप्रधान किसान योजनेच्या सातव्या हप्त्याचे मेसेज पडूनदेखील खात्यात पैसे पडलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यासह पीएम किसान योजनेच्या लाभाची प्रतीक्षा आहे.
शेतरस्त्यावर साचला चिखल
जानेफळ : मागील काही वर्षांत जानेफळ-सोनारगाव या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. डांबरीकरण होणार म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे दानपत्रदेखील दिले आहे. मात्र या रस्त्यावर पहिल्याच पावसात चिखल साचला आहे.
पाडळी परिसरात आराेग्य सर्वेक्षणास प्रारंभ
मासरुळ : प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी अंतर्गत असलेल्या सर्व खेड्यांमध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशक विशेषत: डासांमार्फत प्रसारित होणारे हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़
नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित
डोणगाव : परिसरात १९ मार्च २०२१ राेजी अचानक आलेल्या पाऊस व गारपिटीमुळे कांदा बी, संत्रा, पपई, आंबा, नेटशेड भाजीपाला व मिरचीचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र, या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
देऊळगाव कुंडपाळ : परिसरात ८ जून राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे शेत तलाव फुटल्याने जमीन खरडून गेली. विठ्ठल कैलास सरकटे, कैलास मानिकराव सरकटे, अनिल प्रकाश सरकटे, विलास गणेशराव सरकटे यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.