अहो आश्चर्यम... शेततळ्यात नैसर्गिकरित्या साकारला गेला तिरंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 05:32 PM2018-07-10T17:32:10+5:302018-07-10T17:35:14+5:30

जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरित्या साकारला गेला आहे.

Hey wonder ... Tricolor has landed naturally in the field! |  अहो आश्चर्यम... शेततळ्यात नैसर्गिकरित्या साकारला गेला तिरंगा!

 अहो आश्चर्यम... शेततळ्यात नैसर्गिकरित्या साकारला गेला तिरंगा!

Next
ठळक मुद्देशेततळ्यात पाणी साचल्याने तळातील शेवाळ वर पृष्ठभागावर तरंगला. शेततळ्याच्या दुसºया बाजुची छाया पृष्ठभागावर पडल्याने केशरी रंग तयार झाला. शेततळ्यातील रंगछटेचे हे दृष्य अक्षरश: तिरंगा साकारल्यासारखे दिसत आहे.

- श्याम देशमुख  
पातुर्डा (जि. बुलडाणा):  तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो असाच काहीसा प्रत्यय जस्तगाव वासियांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरित्या साकारला गेला आहे.  रणरणत्या उन्हात जस्तगाव वासियांनी केलेल्या श्रमदानाचे श्रमसाफल्य अशा स्वरूपात दिसल्याने ही एक आगळी वेगळी घटना ठरली.
यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जस्तगावातील नागरीकांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. रणरणत्या उन्हात व रात्री १ वाजेपर्यंत प्रचंड श्रमदान करून गावात पाणी साठवणुकीसाठी शेततळे, बांध खोदून ठेवले. यापैकी येथील गजानन शालीग्राम डोसे यांच्या गावालगतच्या शेतातील शेततळे पहिल्या दमदार पावसात प्रसिध्दी झोतात आले. जस्तगाव शिवारात गावालगत गट नं.८२ मध्ये गजानन डोसे यांचे पाच एकर शेत आहे. या शेतात जस्तगाववासियांनी एप्रिल मध्ये श्रमदान करून १५ बाय १५ आकाराचे शेततळे श्रमदानातून खोदले. अवघ्या तीन दिवसात हे शेततळे खोदून पूर्ण झाले. परिसरात ८ व ९ जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. जलसंधारणाची प्रतीक्षा फळाला आली. सर्वच शेततळी भरून निघाली. यातील एका शेततळ्यात निसर्गाच्या अनोख्या रूपाचे विहंगम दृष्य साकारले गेले. शेततळ्यात पाणी साचल्याने तळातील शेवाळ वर पृष्ठभागावर तरंगला. या हिरव्या रंगाला मधोमध पांढºया रंगाची साथ मिळाली. शेततळ्याच्या दुसºया बाजुची छाया पृष्ठभागावर पडल्याने केशरी रंग तयार झाला. शेततळ्यातील रंगछटेचे हे दृष्य अक्षरश: तिरंगा साकारल्यासारखे दिसत आहे. तिरंगा हा आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग यातून स्पष्ट दिसू लागल्याने जलसंधारणाच्या कामांनी निसर्ग प्रसन्न झाल्याचा आभास निर्माण झाला. काम तन्मयतेने, सकारात्मकतेने केल्यास त्याचे परिणामही सकारात्मक दिसून येतात. हा सृष्टीचा नियम याठिकाणी तंतोतंत लागु पडला. निसर्गाच्या या मनोहारी रूपाने निसर्गप्रेमी आनंदून गेले. 

गावकºयांनी वॉटर कप स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. गजानन डोसे यांच्या शेतातील तळ्यात तिरंगा रंग नैसर्गिकरीत्या साकारला गेला. जलसंधारणाच्या कामांना निसर्गही प्रसन्न झाला आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. आम्ही हा निसर्गाचा आशिर्वाद समजतो.
- योगेश डोसे,उपसरपंच, जस्तगाव.

Web Title: Hey wonder ... Tricolor has landed naturally in the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.